महाराष्ट्र बातम्या

घाण तोंडाचे दरेकर भाजपमध्ये कसे काय?- सुरेखा पुणेकर

नामदेव कुंभार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करताना भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांची जीभ घसरली. शिरूर येथे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त जय मल्हार क्रांती संघटनेने आयोजिलेल्या राज्यव्यापी कार्यकर्ता मेळाव्यात दरेकर बोलत होते. लावणी कलाकार सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रवेशावर नाव न घेता, दरेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आक्षेपार्ह शब्दात टिपण्णी केली होती. याला आता सुरेखा पुणेकर यांनी प्रत्त्युतर दिलं आहे. महिलेचा अपमान करणं तुम्हाला शोभलं का? , घाण तोंडाचे दरेकर भाजपमध्ये कसे काय? असा सवाल सुरेखा पुणेकर यांनी उपस्थित केलाय.

प्रविण दरेकरांना सुरेखा पुणेकर यांनी आपल्या खास शैलीत उत्तरही दिलं. ''घाण तोंडाचे प्रवीण दरेकर भाजपसारख्या चांगल्या लोकांच्या पक्षात कसे काय?'' असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सुरेखा पुणेकर म्हणाल्या, 'मला दरेकरांबाबत खूप वाईट वाटतेय. त्यांना महिलांचा अपमान करण्याचा अधिकार कुणी दिला? आज मी धुण्याभांड्याची कामं करून इथपर्यंत आले आहे. मी जर महाराष्ट्राची कला परदेशात नेऊ शकले, घराघरात मी लावणी कला चुकवली. अशा महिलेला दरेकरसाहेब नावं ठेवत असतील तर ते साफ चुकीचं आहे. महिलांना मान देऊ शकत नाही तर ठीक आहे पण अपमान तरी करू नका. प्रविण दरेकर यांनी दोन दिवसात माफी मागावी अन्य़था याचा परीणाम वाईट होईल.' सुरेखा पुणेकर यांनी 'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत दरेकरांना उत्तर दिलं आहे.

दरम्यान, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. १६ सप्टेंबर रोजी मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर प्रवेश होणार आहे. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्यासह शांताबाई फेम संजय लोंढे, गायिका डॉ. देवयानी बेंद्रे यांच्यासह सोलापूरातील एका दिग्गज नेत्याचाही राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.

महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही आपल्या भाषेत प्रविण दरेकरांचा समाचार घेतला. आम्ही थोबाड आणि गाल रंगवू शकतो, असा इशारा यावेळी दरेकरांना चाकणकर यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करताना प्रवीण दरेकर यांची जीभ घसरली होती. अतिशय अर्वाच्य भाषेत राष्ट्रवादीवर टिपण्णी केली होती. या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे, असल्याचा गंभीर आरोपही दरेकरांनी यावेळी केला. दरेकरांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. दरेकांना महिलांची माफी मागावी, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT