Sangali Lok Sabha:  sakal
महाराष्ट्र बातम्या

Sangali Lok Sabha: सुरेश खाडेंनी पोलिस बळ वापरून ‘रात्रीत खेळ’ केला, खा. विशाल पाटलांचा आरोप

Vishal Patil Sangali: आता विधानसभेला प्रामाणिक काम करणारा माणूस येथून निवडून द्यायचा आहे.’’

सकाळ वृत्तसेवा

Miraj News: ‘‘लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पोलिस बळाचा वापर करून रात्रीत खेळ करण्याचा प्रयत्न केला. ताकद लावली, मात्र मिरजेच्या स्वाभिमानी जनतेने त्यांचे ऐकले नाही,’’ अशी जोरदार टीका खासदार विशाल पाटील यांनी शनिवारी (ता. २२) रात्री मिरज येथे केला.

खासदार झाल्याबद्दल विशाल पाटील यांचा मिरज तालुका काँग्रेसतर्फे सत्कार करण्यात आला. आमदार विश्‍वजित कदम, विक्रम सावंत, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, डॉ. जितेश कदम, मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे, सुरेश आवटी आदी व्यासपीठावर होते.

विशाल पाटील म्हणाले, ‘‘मिरज मतदार संघातून एक लाख १० हजार मतदान मिळाले. या मतदार संघाचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. खूप जोर केला, दबाव टाकला. आरोप आहेत की, पोलिस यंत्रणा वापरून ‘रात्रीत खेळ’ करून मते वळवण्याचा उद्योग केला गेला. पण मिरजकरांनी दाखवले, आम्ही स्वाभिमानी आहोत. २५ हजारांवर मताधिक्य दिले गेले. आता विधानसभेला प्रामाणिक काम करणारा माणूस येथून निवडून द्यायचा आहे.’’

आमदार विश्‍वजित कदम म्हणाले, ‘‘मिरज शहर, तालुक्याचे प्रश्‍न आपणास सोडवायचे आहेत. मिरज विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकवायचा आहे. एक सक्षम उमेदवार देण्याबाबत विचार सुरू आहे.’’ माजी महापौर किशोर जामदार, मैनुद्दीन बागवान, संजय मेंढे, आनंदा देवमाने, संभाजी मेंढे, बाबगोंडा पाटील, प्रा. सिकंदर जमादार, बाळासाहेब होनमोरे, विज्ञान माने, इंद्रजित घाटे, निरंजन आवटी आदी उपस्थित होते.

फडणवीसांवर टीका

खासदार विशाल पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणप्रश्‍नी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली. मनोज जरांगे-पाटील यांना दिलेला त्रास समाजाला आवडला नाही. त्याचा बदला समाजाने घेतला.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

Kirit Somaiya Amravati Meeting Controversy : आयुक्तांचा बचाव करणारे महापौर सापडले अडचणीत; किरीट सोमय्यांची अमरावतीची बैठक ठरतेय वादग्रस्त?

Ajit Pawar Plane Crash: 'व्हीएसआर'च्या विमान उड्डाणांवर बंदी; बारामती विमान अपघात प्रकरणी DGCAची मोठी कारवाई

Pune Crime : बारावीचा पेपर संपताच कोथरूडमध्ये विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; दोन अल्पवयीन ताब्यात

Fruit Drink Maaza: 'माझा'च्या छोटा पॅकमध्ये आढळली घाण; ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली

SCROLL FOR NEXT