Sushma Andhare 
महाराष्ट्र बातम्या

Sushma Andhare : शेलार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मांडवली झाली? सुषमा अंधारे असं का म्हणाल्या...

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राचे राजकीय तापमान चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज रत्नागिरीत जाहीर सभा सुरू आहे. या सभेत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे, आशिष शेलार व किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टिका केली. 

सुषमा अंधारे म्हणाल्या, कोकणाने निष्ठावंत शिलेदार शिवसेनेला दिले. पण नियमाला अपवाद असतो तसे वटवृक्षावर वाढणारे बांडगुळही दिले. काळ उत्तर देत असतो. रामदास कदमना उत्तर देण्यासाठी त्यांच्या दहा पट ताकदीचा संजय कदम नावाचा चेहरा आज शिवसेनेत दाखल होत आहे.

"मी शिवसेना उल्लेख करते कारण ओरिजनल शिवसेना आम्ही आहोत, निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. ओरिजनल बरोबर नसताना काय होत हे कसब्यात दिसलं", असे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या.

"संजय कदमांच्या विभागवार सभांची सुरुवात होत आहे. शिवगर्जना सभा, पक्षप्रमुख यांच्या सभा, विभागवार सभा कशासाठी? निवडणूका लागलेल्या नाहीत तरी सभा घेण्याचे कारण मतांसाठी नाही तर मराठी माणसाच्या हितासाठी आहे," असे अंधारे म्हणाल्या.

"आम्ही वाट पहात आहोत अर्थसंकल्पीय अधिवेशनात समस्यांबद्दल सत्ताधारी बोलतील. परंतु त्याजागी हक्कभंग इ. मोठे मोठे शब्द घेऊन ते उभे आहेत.अंधारे यांनी आशिष शेलार यांना देखील टोला लगावला. हम बोल रहे हैं, चोर की दाढी मे तिनका! तो आशिष शेलार क्यों दाढी टटोल रहे हैं?," असा टोला सुषमा अंधारे यांनी शेलारांना लगावला. 

"दावोसला २०-२० तास एकनाथभाऊ जागे राहत होते. मात्र दावोसच कार्यालय ५व ६ ला बंद होत होत. तर ६ ते २ एकनाथभाऊ कुणासाठी काम करत होते?, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

"एक हजार कोटीची जागा एकनाथ शिंदेंनी नगरविकास मंत्री असताना कवडीमोल भावाने विकली, ज्याबद्दल आशिष शेलारांनी जनहित याचिका दाखल केली. सत्तेत आल्यावर शेलार बोलले नाहीत, त्यांच्यात काय मांडवली झाली? किरीट भाऊंनी डंपिंग ग्राउंडवर छोट्या छोट्या बाटल्या शोधण्यापेक्षा अख्ख डंपींग ग्राउंड देते. नोंदणी न झालेल्या पक्षाच्या सभेसाठी बीकेसीच्या ग्राऊंडवर करोडो खर्च कुठुन झाला? नारायण राणेंच्या बेकायदा बांधकामाबद्दल बोला," असे अंधारे म्हणाल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT