Sushma Andhare esakal
महाराष्ट्र बातम्या

'नंगटपणा हा....', अमृता फडणवीसांचा स्विमिंगपूलमधील फोटो शेअर करत अंधारे म्हणाल्या...

उर्फी आणि चित्रा वाघ यांच्या वादात अंधारे यांनी शेअर केला अमृता फडणवीस यांचा स्विमिंगपूलमधील फोटो

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात कपड्यांवरुन वाद सुरु आहे. या वादात आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांचा स्विमिंगपूलमधील फोटो शेअर केला आहे. आणि भली मोठी पोस्ट लिहिली आहे. (Sushma Andhare Devendra Fadnavis Amruta Fadnavis ketaki chitale Urfi Javed maharashtra politics )

नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्या साठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल. असा सवाल अंधारे यांनी उपस्थिती केला आहे.

“अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया. पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी? उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” असा सवालही अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून केला आहे.

सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, यानंतर उर्फी जावेदनंही त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : डेटिंग ॲप वर मुलीचे बनावट प्रोफाइल तयार करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT