sushma andhare  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sushma Andhare: शिंदे गटाची मोठी खेळी! सुषमा अंधारेंचे पती शिंदे गटात करणार प्रवेश

सुषमा अंधारे यांना एकनाथ शिंदे गटाचा मोठा झटका

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मदतीला मुलूख मैदानी तोफ भेटली. सुषमा अंधारे यांनी संधी साधत उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश करताच अंधारे यांना पक्षाच्या उपनेत्या हे पद देण्यात आलं.

हेही वाचा - गौतमी नाचली, तुमचं काय गेलं?

अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेल्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना एकनाथ शिंदे गटाने मोठा झटका दिला आहे. सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे, हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळं आता अंधारेंसाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.

पक्षात फुट पडल्यानंतर अनेकांच्या घरात देखील उभी फुट पडली. वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येवू शकते. त्यामुळे सुषमा अंधारे यांच्या आक्रमकतेवर गदा येणार का असा प्रश्न पडू लागला आहे. तर असं ही सांगितल जात आहेत की सुषमा अंधारे यांना रोखण्यासाठी ही शक्कल लढवली आहे.

सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले पती वैजनाथ वाघमारे अडसरकर यांच्या सोबत, अभिनेत्री दिपाली सय्यद यांचाही आज शिंदे गटात प्रवेश होणार आहे. ठाण्यात आज एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहणार आहेत. त्यामुळे अंधारे बॅकफूटवर जातात की अधिक आक्रमक होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC : एमपीएससीच्या मुलाखती पुढे ढकलल्या; पात्र उमेदवारांवर मोठा अन्याय

Traffic Challan: कारमध्ये गाणं वाजवलं तर लागणार मोठा दंड, गाडी जप्तही होऊ शकते; काय आहे नियम?

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Vishwa Shanti Yatra : आंतरिक शांतीतून विश्वशांती; अभूतपूर्व 'विश्व शांती यात्रा २०२६'चे आयोजन

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

SCROLL FOR NEXT