Sushma Andhare Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sushma Andhare : मेहंदीवाल्याचा हिशोब मागता, पण बीकेसी सभेचा हिशोब का मागत नाही?

संजय राऊतांची भेट घेतल्यानंतर सुषमा अंधारे यांनी ईडीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना खासदार संजय राऊत यांची नुकतीच तुरुंगातून जामिनावर सुटका झाली आहे. त्यानंतर ते अनेक नेत्यांची भेट घेत आहेत. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच ईडीच्या तपासावर प्रश्नचिन्हही उपस्थित केलं आहे. विरोधकांवरही त्यांनी टीका केली आहे.

जामीन देताना ईडीने संजय राऊतांना केलेली अटक बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने नमूद केलं होतं. या आदेशाचा उल्लेख करत सुषमा अंधारे म्हणाल्या, "न्यायालयाने मान्य केलं आहे, राऊतांवरची कारवाई बेकायदेशीर आहे. आता यावर सभागृहात चर्चा व्हायला हवी. ईडीकडून राऊतांच्या मुलीच्या लग्नातल्या मेहंदीवाल्याचाही हिशोब मागितला जातो. पण मग बीकेसीमध्ये जी सभा झाली. त्यात लाखो रुपये खर्च झाले. तो गट अजून नोंदणीकृत नसतानाही एवढे पैसे कुठून आले? त्याचा हिशोब का नाही मागितला? किरीट सोमय्या त्यावर का बोलत नाहीत? प्रताप सरनाईक, भावना गवळी यांना माफिया म्हणत होते. मग आता त्यांच्यावर एफआयआर कधी करणार?"

हेही वाचा - विमा पाॅलिसींचे डी-मॅट पाॅलिसीधारकांनाच पोहचवेल नुकसान?

दरम्यान, किरीट सोमय्या आज रत्नागिरीमध्ये दाखल झाले आहेत. रत्नागिरीत अनिल परब यांच्या साई रिसॉर्टवर कारवाई करण्याच्या संदर्भात त्यांचा हा दौरा आहे. याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी सोमय्यांवर टीका केली आहे आणि बीकेसीतल्या सभेचाही हिशोब मागा, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT