Sushma Andhare will join Shiv Sena tomorrow  
महाराष्ट्र बातम्या

शिवसेना प्रवेशाच्या पूर्वसंध्येलाच अंधारे आक्रमक; म्हणाल्या, शेंडी-जाणव्याचं...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - निम्याहून अधिक शिवसेना रिकामी झाली असताना आणि शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुषमा अंधारे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे. गुरुवारी सकाळी १२ वाजता त्या उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहे. मात्र प्रवेशाच्या पूर्वसंध्येलाच अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. (Sushma Andhare news in Marathi)

शिवसेनेला आणि संपूर्ण शिवसेना कुटुंबाला माझी गरज आहे. तर शिवसेनेची गरज संपूर्ण महाराष्ट्राला आहे. आता याक्षणी मी हा निर्णय घेणं गरजेचं आहे. तसेच माझ्यावर ईडी, किंवा सीबीआयची चौकशी नाही. त्यामुळे मला भीती वाटण्यासारख काहीही नाही, असं अंधारे यांनी म्हटलं.

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेकदा सांगितलं की, माझं हिंदुत्व शेंडी-जाणव्याचं नाही. माझं हिंदुत्व मॉब लिंचिंग करणारं नाही, केतकी, कंगना, नुपूर यांना पाठिशी घालणारंही नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचं म्हणत अंधारे यांनी भाजपसह शिंदे गटावर टीका केली.

सध्या शिवसेना कोणाची यावरून पेच निर्माण झालेला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाला पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुढे काय होणार हे पाहणं औत्सुक्य ठरणार आहे. मात्र अशा स्थितीत देखील अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेणे धाडसाचं मानल जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT