Devendra Fadnavis
Devendra Fadnavis 
महाराष्ट्र

Shivsena: फडणवीसजी तुम्ही जिंकलात, तुमचं अभिनंदन; सुषमा अंधारे यांचं सूचक ट्विट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. तसेच संपूर्ण पक्ष माझ्यासोबत असल्याचं म्हणत शिवसेना पक्षावर आपला हक्का सादर केला होता. त्यामुळे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या पक्ष चिन्हाचा मुद्दा निवडणूक आयोगाकडे गेला होता. मात्र आज निवडणूक आयोगाने हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय़ घेतला आहे. शिवाय शिवसेना नाव दोन्हीपैकी एकाही गटाला वापरता येणार नाही, हेही स्पष्ट करण्यात आलं आहे. यावर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (sushma Andhare news in Marathi)

सुषमा अंधारे म्हणाल्या की, "आम्ही हरलो म्हणजे तुम्ही जिंकलात असं होत नाही डाव तुमच्या हातात असला तरी, जिंकता तुम्हाला येत नाही. मोदी-शहा जी फडणवीसजी तुम्ही जिंकलात? अभिनंदन! पण तुम्ही जिंकू शकला कारण आमच्यातल्याच फितुरांनी साथ दिली; अन्यथा तुमच्यात ती धमक नक्कीच नव्हती. पण आम्ही खडकातूनही पुन्हा उगवू, असंही अंधारे यांनी म्हटलं.

दरम्यान निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवलं असून ते रद्द केलेलं नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील निर्णय ठाकरे गटाच्या बाजुने गेल्यास धनुष्यबाण चिन्ह पुन्हा एकदा ठाकरे गटाला मिळू शकेल. मात्र या जर तरच्या बाबी आहे. सध्या तरी ही निर्णय तात्पूरत्या स्वरुपाचं असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

अंधेरी पूर्व येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी निवडणूक आयोगाला पत्र लिहून शिवसेनेच्या निवडणूक चिन्ह धनुष-बाणावर दावा सांगितला होता. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता निवडणूक चिन्हाचा हा वाद लवकर निकाली काढणे आवश्यक आहे. कारण उद्धव ठाकरे गट आपल्या उमेदवारांसाठी धनुष्य-बाण चिन्हावर दावा करू शकते, असंही पत्रात नमूद केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामान खात्याची मोठी माहिती

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापूर-पेणमधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार; पश्चिम बंगालमध्येही आंदोलन

"मी हत्या केलीच नाही," हत्येचे 8 गुन्हे असलेल्या महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT