Sushma Andhare and Sanjay Shirsat 
महाराष्ट्र बातम्या

Shirsat Vs Andhare: "आमदारकी सोडणं सोपं असतं तर गुवाहाटी दौरा झाला नसता" सिरसाटांच्या इशाऱ्याला अंधारेंचं प्रत्युत्तर

आमदार संजय शिरसाट यांच्या पत्रकार परिषदेवरुन सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यामध्ये सध्या चांगलाच संघर्ष पहायला मिळतो आहे. शिरसाट यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारेंवर सडकून टीका केली होती. तसेच त्यांना इशारा देताना "आमदारकी उडत गेली, धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही" असा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्याला आता अंधारे यांनी प्रत्युतर देताना गुवाहाटी प्रकरणाचा उल्लेख करत त्यांना प्रत्युत्तर दिलं.

"आमदारकीचा राजीनामा देईन, सत्ता त्यागेन असं म्हणणं जर इतकं सोपं असतं तर या लोकांनी सूरत, गुवाहाटी हा प्रवासच केला नसता. त्यामुळं नैतिकतेच्या गप्पा यांच्या तोंडी शोभत नाही. मी अबला नारी नाही किंवा मी सहानुभुतीचं राजकारण करणार नाही. पण वारंवार महिलांबाबत बेतालं विधानं ही फक्त शिंदे गटाकडूनच होत आहेत" अशा शब्दांत अंधारे यांनी शिरसाटांना प्रत्युत्तर दिलं आहे.

"मला कमाल वाटते की, हे शिवरायांचे, बाळासाहेबांचे वारसदार किंवा फॉलोवर्स असूच शकत नाहीत. अब्दुल सत्तारांची, गुलाब पाटलांची भाषा आपण ऐकली होती आता संजय शिरसाट यांची भाषा आपण ऐकली. शिरसाटांच्या भाषेचं आणि अहंकारांचं मला अजूनही कौतुक वाटतंय कारण त्यांची पत्रकार परिषदेतील भाषा ही त्यांच्या संस्कारांचा परिचय देणारी होती. या संस्कारांचा परिचय देताना त्यांनी आज पुन्हा माझा बाप वैगरे काढलं"

या सगळ्या प्रकरणात मला पोलिसांनी सांगितलं की, "आम्ही गुन्हा नोंदवून घेऊ शकत नाहीत. हे प्रकरण कायद्याच्या व्याख्येत बसत नाही. याचा अर्थ संजय शिरसाट उत्तम प्रकारे कायद्याचं सल्ला घेऊन महिलांचे वाभाडे काढण्याचं मिशन हातात घेतलं आहे, असा गंभीर आरोपही यावेळी अंधारे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंकडून कायदेशीर नोटिसीला उत्तर, सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले

Rare Albino Snake : काळा नाहीतर चक्क पांढराशुभ्र! सिंधुदुर्गातील पावशीत आढळला अत्यंत दुर्मीळ विषारी 'अल्बिनो मण्यार'; गुळगुळीत शरीर अन्.. काय आहे खासियत?

SCROLL FOR NEXT