Andhare_Ponkshe 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Ponkshe: "आरक्षण नसताना..."; पोंक्षेंच्या पोस्टला अंधारेंचं सडेतोड उत्तर; म्हणाल्या, माझं कौतुक...

शरद पोंक्षेंनी मुलीच्या कौतुकासाठी लिहिलेल्या पोस्टमध्ये आरक्षणाचा उल्लेख केल्यानं सोशल मीडियात ते ट्रोल होत आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगी कर्मर्शिअल पायलट झाली आहे. याचा आनंद व्यक्त करताना त्यांनी सोशल मीडियावर लेकीच्या कौतुकाची पोस्ट लिहिली होती. पण ही पोस्ट लिहिताना त्यांनी सामाजिक आरक्षणावर भाष्य केलं होतं.

त्यांची ही पोस्ट अनेकांना खटकली होती. त्यावरुन सोशल मीडियावर त्यांना ट्रोलही व्हावं लागलं. पण आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शरद पोंक्षेंना सडेतोड उत्तर दिलं आहे. फेसबुकवरील दीर्घ पोस्टच्या माध्यमातून त्यांनी पोंक्षेंना खोचक टोलाही लगावला आहे. (Sushma Andhare scathing reply to Sharad Ponkshe reservation post)

आरक्षणाशिवाय माझी गुणवत्ता सिद्ध

सुषमा अंधारेंनी आपल्या पोस्टची सुरुवातच जातीभेदाच्या मुद्द्यावरुन केली आहे. त्यानंतर त्यांनी पोंक्षेंच्या लेकीचंही अभिनंदन केलं. लेक कोणाचीही असो तिचं कौतुक झालंच पाहिजे असं सांगताना आपण माणूस म्हणून किती नालायक आहोत हे दाखवायला हवंच का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

यानंतर त्यांनी अहिंसेचा उल्लेख करत खरा अहिंसावादी कोण? हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी कुठल्याही राजकीय, आर्थिक आणि जातीय आरक्षणाशिवाय माझी गुणवत्ता सिद्ध केली आहे, हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिल्याचं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. (Latest Marathi News)

माझं कौतुक तुमच्यापेक्षा दुप्पट

तसेच ज्या आरक्षणाबद्दल तुम्ही तिरस्कारानं लिहिलं आहे त्या आरक्षणाची लाभार्थी होणं मला सहज शक्य होतं. पण मी हे आरक्षण न घेता खुल्या प्रवर्गातून शिक्षण पूर्ण केलं. ते नुसतं पूर्णच केलं नाहीतर विशेष प्राविण्यासह केलं. विद्यापीठ, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पाच सुवर्णपदकांसह पूर्ण केलं आहे. त्यामुळं आरक्षण मिळत असतानाही ते नाकारण्याची हिंमत मी केली. त्यामुळं तुम्हाला मी आरसा दाखवू शकते. मग माझं कौतुक तुमच्यापेक्षा दुप्पट नाही का?

त्यांची जात माहिती होती का?

कुठल्या जातीत जन्माला यायचं यात आपलं काही कर्तुत्व नाही याची जशी लाज बाळगू नये तसा माजही असू नये, याचं भान तुम्हाला असायला हवं. तुम्ही नुकत्याच एका दुर्धर आजारातून बरे झाला आहात. या काळात तुमचा संबंध लॅब, मेडिकल स्टोअर, डॉक्टर्स, दिवसरात्र सेवा देणाऱ्या नर्सेसशी आलाच असेल त्यांच्या जाती तुम्हाला माहिती होत्या का?

शेवटी जर तुमचं जातविषयक पित्त वारंवार उफाळून येत असेल तर बुद्ध, गुरुनानक, महावीर, कबीर, संत ज्ञानेश्वर, तुकोबाराय यांच्या विचारांचा काढा नियमित घेत चला, खात्रीनं इलाज होईल, अशा आशयाची सडेतोड पोस्ट सुषमा अंधारे यांनी लिहिली आहे. (Marathi Tajya Batmya)

पोंक्षेंची पोस्ट काय होती?

"कू सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. ईयत्ता ४ पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून,माझं आजारपण,कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे पार करत.बॅकेचं कर्ज काढून,कोणतीही सवलत,आरक्षण नसताना केवळ मेहनत ,बुध्दीमत्ता ,परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली.बापाला आणखी काय हव नाही का?आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तूझा सिध्दी.मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे.करशिलच खात्रीच आहे. लव यू बाळा" अशी पोस्ट शरद पोंक्षे यांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT