Sushma Andhare esakal
महाराष्ट्र बातम्या

Sushma Andhare: सुषमा अंधारे यांचा पर्दाफाश करणार; विभक्त पती ॲड. वाघमारे यांचा इशारा

संतोष कानडे

मुंबईः ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती ॲड. वैजनाथ वाघमारे यांनी सुषमा अंधारे यांना थेट इशारा देत त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं आहे. शिवाय लवकरच सुषमा अंधारे यांचा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा ॲड. वाघमारे यांनी दिलाय.

ॲड. वैजनाथ वाघमारे हे सुषमा अंधारे यांचे पूर्वाश्रमीचे पती आहेत. आज ते शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धडाडीचं नेतृत्व आहे. त्यांची भूमिका सर्वसामान्यांना न्याय देणारी आहे. त्यामुळे आपण शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

पुढे बोलतांना वाघमारे म्हणाले की, सुषमा अंधारे आणि मी १५ वर्षे सोबत काम केलं. मात्र मागील पाच-सहा वर्षांपासून माझा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. मात्र त्यांनी एका सन्माननीय मंत्र्यांबद्दल जी आक्षेपार्ह टिपण्णी केली ती निषेधार्ह आहे.

आपण लवकरच सुषमा अंधारे यांची पोलखोल करुन पर्दाफाश करणार असल्याचं ॲड. वैजनाथ वाघमारे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या विभक्त पतीला पुढे करुन शिंदे गटाने एक वेगळीच खेळी केली आहे. त्यांच्या आक्रमक शैलीला कुठेतरी बांध घालण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होत असल्याचं दिसून येतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup IND vs NAM : अभिषेक शर्मा मुकला, टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये केले दोन बदल; नामिबियाने टॉस जिंकून....

Maharashtra Politics : "नेत्याच्या निधनाबाबत सत्य समोर यावे; शांत राहणे नैतिकतेला शोभणारे नाही..." : आमदार अमोल मिटकरी

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांची पुण्यासाठी पहिलीच डीपीसी बैठक; १ हजार ३२ कोटींच्या विकासकामांना मंजुरी

Mokhada News : मोखाड्यातील बालकांनी अनुभवले मंत्रालय, मंत्र्यांशी मारल्या दिलखुलास गप्पा; परिवर्तन संस्थेचा पुढाकार

Latest Marathi News Live Update : संजय राऊत यांनी डोळ्यावर पट्टी बांधली का हे पाहावे लागेल - संदीप देशपांडे

SCROLL FOR NEXT