MLA सचिन कल्याणशेट्टी

 
sakal
महाराष्ट्र बातम्या

संशयिताची रवानगी न्यायालयीन कोठडीत! अक्कलकोटचे आमदार कल्याणशेट्टी यांना जिवे मारण्याची धमकी देणारा श्रीशैल हुळ्ळे म्हणाला, ‘मी सहजच बोललो अन्‌...

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना गोळी घालून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल झाला. यातील मुख्य संशयित श्रीशैल हुळ्ळे (मूळ रा. वडगाव, ता. दक्षिण सोलापूर) यास न्यायालयाने वाढीव पोलिस कोठडी नाकारत त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

तात्या लांडगे

सोलापूर : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना गोळी घालून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल झाला. यातील मुख्य संशयित श्रीशैल हुळ्ळे (मूळ रा. वडगाव, ता. दक्षिण सोलापूर) यास न्यायालयाने वाढीव पोलिस कोठडी नाकारत त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

आमदार कल्याणशेट्टी ७ ऑगस्टला सोलापुरातील महावीर चौकातील प्युमा शोरूममध्ये कपडे खरेदीसाठी आले होते. त्यावेळी त्यांचा चालक आनंद सुरवसे (रा. मोट्याळ, ता. अक्कलकोट) गाडीतच बसून होता. त्यावेळी श्रीशैल हुळ्ळे व त्याचा चालक प्रभाकर फुलारी त्याठिकाणी गेले. त्यावेळी हुळ्ळेने आमदारांच्या गाडीच्या चालकास पैशाचे आमिष देऊन, ‘तुझ्या आमदाराला गोळी घालून मार, मी पुढचे बघतो, तुला पैसे देतो,’ असे म्हणाला. त्यानंतर फुलारीने, ‘साहेब काय म्हणतात ते ऐक, यात तुझाच फायदा आहे,’ असे म्हणून प्रेरित केले.

या प्रकरणी आनंद सुरवसे याने सदर बझार पोलिसांत धाव घेतली. रविवारी (ता. ९) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सहायक पोलिस निरीक्षक राहुल सावंत यांनी फुलारीला काही तासांतच पकडले, पण हुळ्ळे पसार झाला होता. बुधवारी (ता. १२) मध्यरात्री पोलिसांनी हुळ्ळेला कोल्हापूरजवळ पकडले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली होती. त्यानंतर पोलिसांची वाढीव कोठडीची मागणी फेटाळत त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

मुख्य संशयित हुळ्ळे म्हणाला...

गुन्ह्यातील मुख्य संशयित हुळ्ळे याच्याकडे एका दिवसाच्या पोलिस कोठडीत तीन अधिकाऱ्यांनी तपास केला. त्यावेळी तिन्ही अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर हुळ्ळे एकच उत्तर देत होता, ‘मी सहजच बोललो, तो आनंद सुरवसे माझा ओळखीचा आहे, मी चौकातील एका हॉटेलचे काम सुरू असल्याने तेथे आलेलो होतो.’ त्याच्याकडे पोलिसांना बेकायदा बंदूक आढळली नाही, त्याच्या चौकशीतही संशयास्पद काही आढळले नाही, असेही पोलिस सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT