Supreme Court Lifts Ban On Malyalam News Channel sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: महाराष्ट्र विधान परिषदेतील १२ सदस्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती कायम

१२ सदस्यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी निर्णय घेतला नव्हता

सकाळ डिजिटल टीम

राज्यपालांकडून रखडलेल्या महाराष्ट्र विधान परिषदेतील १२ सदस्यांच्या नियुक्त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दोन आठवड्यांसाठी स्थगिती कायम ठेवण्यात आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना १२ सदस्यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर राज्यपालांनी उद्धव ठाकरे  सरकारचा  प्रस्ताव परत पाठविला आणि शिंदे सरकारकडून नव्याने  प्रस्ताव पाठविण्याच्या  हालचाली  सुरू  झाल्या.  या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली.

न्या. के. एम. जोसेफ व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने २६  सप्टेंबर २०२२  रोजी राज्यपालांनी करावयाच्या या  नियुक्त्यांवर निर्बंध घातले होते. त्या नंतर  या याचिकेवर पाच वेळा सुनावणी झाली. परंतु राज्य सरकार उत्तर देत  नसल्याने स्थगिती  कायम  ठेवण्यात आली. आता खंडपीठाने  राज्य  सरकारला  दोन आठवड्यांनी उत्तर देण्याचे निर्देश दिले  आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : श्रीकृष्ण जन्मभूमी वादात मोठा ट्विस्ट; ‘मुख्य दावा’ कोणाचा? सर्वोच्च न्यायालयाचे मोठे संकेत

Gokul Election Update : गोकुळच्या 'त्या' 194 दूध संस्थांचे अवसायन रद्द; मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय, या संस्थांना मिळणार मताधिकार?

‘मुळशी पॅटर्न’मुळे नाव देशभर गाजलं, पण बदनामी झाली; आता ‘पॅटर्न 2’ला मुळशीकरांचा विरोध! प्रवीण तरडेंना टेन्शन

Ghatkopar Landslide: नेटवर्क नसल्यानं डोंगरावरील घरात गेला, बर्थडेच्या आदल्या दिवशी ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT