Mumbai  
महाराष्ट्र बातम्या

Mumbai : 'त्या' पाच लिपिकांचे निलंबन अखेर रद्द; परिवहन आयुक्तांनी घेतला निर्णय

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : स्वामी समर्थ परिवाराचे लक्ष्मीकांत दांडेकर यांच्या वाहनावरील करमाफी करण्यासंदर्भात परिवहन आयुक्तांनी बोरिवली आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्याला सूचना दिल्या होत्या. मात्र, यासंदर्भात आपल्याला अधिकार नसल्याचे सांगत आयुक्तांकडे जावे असे उत्तर दिल्याने तडकाफडकी आयुक्तांनी लिपिकाला निलंबित केले होते.

मात्र, कर्मचारी संघटनेच्या दबावामुळे अखेर परिवहन आयुक्तांनी निलंबन रद्द केलs आहे. यासोबतच राज्यातील इतर चार लीपिकांचेही निलंबन रद्द केले आहे.

कोरोना महामारीच्या दरम्यान उभ्या असलेल्या वाहनाला कर माफी देण्याची शासनाची योजना आहे. त्यामुळेच दांडेकर यांनी आपल्या वाहनांची कर माफिसाठी बोरिवली आरटीओ कार्यालयात करमाफी साठी प्रस्ताव टाकला होता. मात्र, दरम्यानच्या काळात दांडेकर यांच्या वाहनावर ई चलानं झाली असल्याने वाहन नॉन युज नसल्याचे आरटीओ कर्मचारी संघटनांकडून आरोप करण्यात आला होता.

त्यामुळेच बोरिवली आरटीओतील लिपिक अजिंक्य पाटील यांचे निलंबन बेकायदा असल्याचे सांगून, निलंबन रद्द करण्याची मागणी कर्मचारी संघटनेने केली होती.

मात्र, आता आयुक्तांनी लिपिक पाटील यांच्यासह अकोला येथील किशोर देशमुख, रमाकांत जोगेवार, अमरावतीचे मनोज खोब्रागडे, सुनील सूर्यवंशी यांचेही निलंबन रद्द करण्यात आले आहे.

दरम्यान पदस्थापना प्रादेशिक परिवहन कार्यालयात देताना कोणत्याही पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात येऊ नये, तसेच विभागीय चौकशीचे कामकाज पूर्ण होईपर्यंत वाहन ४.० व सारथी ४० या संगणक प्रणालीमध्ये कोणतेही कामकाज न देता आस्थापना, ऑडीट, थकित कर वसूली विभाग, लेखापरीक्षण, सामान्य प्रशासन विभाग अशाप्रकारच्या जनसंपर्क न येणाऱ्या विभागात कामकाज देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्टेशनवर गर्दी, ट्रेनमध्ये चढण्याऐवजी वृद्ध थेट इंजिनवरच उभा राहिला; VIDEO VIRAL

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

जरागेंच्या उपोषणाचा १० वा दिवस, प्रकृती खालावल्यानं मराठा बांधवांचा सरकारला इशारा | Jarange Patil

दीप-ज्योतीची वाढती जवळीक तर तारिणीच्या जीवाला धोका; ‘झी मराठी’वरील मालिकांमध्ये या आठवड्यात काय घडणार?

Marathi News Live Updates : सर्वोच्च न्यायालयाने अरावली पर्वताबाबत अहवालाची मुदत वाढवण्याची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT