Raju Shetty
Raju Shetty  sakal
महाराष्ट्र

राजू शेट्टींची मोठी घोषणा; 'स्वाभिमानी' मविआतून बाहेर

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याची मोठी घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार असल्याचेही यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितले. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार आले होते. साताऱ्यातल्या सभेत पवार साहेब यांनी भिजत भिजत सांगितले होते. पवार साहेब भिजले पण त्यात राज्यभरातील शेतकरी विरघळून गेला. तिन्ही पक्षातील नेत्यांची दिल्लीत भूमिका वेगळी दिसते, मुख्यमंत्री निवडीच्या वेळी सूचक म्हणून मी चालतो, पण शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेताना साधे विचारलेदेखील जात नाही अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यात केंद्र आणि राज्य अपयशी

शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने उपेक्षीत नागरिकांना उद्ध्वस्त केले आहे. निवडणूक लढवता यावी म्हणून आपण चळवळ उभी केली नाही तर, चळवळ टिकावी म्हणून आपण निवडणुकीचा मार्ग स्वीकारला असल्याचे राजू शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले.

दुधाला देखील हमीभाव द्यावा : राजू शेट्टी

पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, दुधालादेखील हमीभावाच्या कक्षेत आणण्याची मागणी केली आहे. तसेच 24 पिकांव्यतिरिक्त भाजीपाला फळं आणि दुध यांना देखील हमीभावात समावेश करावा अशी मागणी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलीय. 1 मे ला संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामसभा होणार आहेत. या ग्रामसभेमध्ये दुधाला हमीभाव देण्याचा ठराव करण्यात यावा, किमान दहा हजार ग्रामपंचायतीमध्ये हा ठराव करण्याविषयी शेट्टींनी मार्गदर्शन केले. जसा असंघटीत कामगारांसाठी किमान वेतन कायदा आहे. तसाच कायदा संसदेने असंघटीत शेतकऱ्यांसाठी करण्याविषयीचा ठराव देखील ग्रामसभेमध्ये करण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्याचे सुतोवाच राजू शेट्टींनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT