Varsha Gaikwad. 
महाराष्ट्र बातम्या

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, शाळा बंद विद्यार्थ्यांसाठी नववर्षात "स्वाध्याय'चा उपक्रम ! 

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्वच आणि आठवी ते बारावीपर्यंतच्या बहुतांश शाळा आता बंद आहेत. या पार्श्‍वभूमीवर शालेय शिक्षण विभागातर्फे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी "स्वाध्याय' SWADHYAY (Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana) या योजनेचे उर्दू माध्यमाचे उद्‌घाटन आज (शुक्रवारी) सकाळी 11 वाजता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मुंबईत केले जाणार आहे. या योजनेसाठी राज्यमंत्री बच्चू ऊर्फ ओमप्रकाश कडू यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. 

योजनेच्या उद्‌घाटनप्रसंगी अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, महाराष्ट्र राज्य प्रकल्प संचालक तथा संचालक राहुल द्विवेदी यांच्यासह सर्व शिक्षण संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी व विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक हे ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत. 

यावरून पाहता येणार थेट प्रक्षेपण 
https://youtu.be/UNpEvZl7RIw येथे पाहता येईल. याच वेळी विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ कसा घ्यायचा, शालेय शिक्षण विभाग यांचा नववर्ष संदेश देखील दिला जाणार आहे. दरम्यान, प्राचार्य व मुख्याध्यापक यांनी या सुविधेबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावे व सर्व विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम यू - ट्यूबवर पाहता येणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT