महाराष्ट्र बातम्या

MPSCच्या 'त्या' मुलाखतीच्या यादीमध्ये स्वप्निल लोणकरचंही नाव

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. स्वप्निलची ही काळजाला चटका लावून जाणारी आत्महत्त्या चर्चेचं कारण ठरली होती. त्याच्या या आत्महत्येची चर्चा देखील बरीच झाली होती. त्याने लिहलेलं शेवटचं पत्र वाचून अनेकांचे हृदय हेलावलं होतं. स्वप्नील एमपीएससीच्या २०१९च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र, त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झाली नव्हती. त्याचबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली. त्यामध्ये पूर्व परीक्षा तो उत्तीर्ण झाला. मात्र, कोरोनामुळे मुख्य परीक्षा झाली नव्हती. या तणावातून आत्महत्या केल्याचे त्याने मृत्युपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केलं होतं. जी मुलाखत दीड वर्षापासून झालेली नव्हती, त्याच मुलाखतीच्या यादीमध्ये आता स्वप्नील लोणकरचं नाव आलं आहे.

फुरसुंगी जवळील गंगानगर येथे बुधवारी दुपारी ही घटना घडली होती. त्याचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत प्रिटींग प्रेसचा व्यवसाय आहे. स्वप्नीने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी संपादन केली होती.

मन हेलावून टाकणारं पत्र

कोरोना नसता तर सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या. हवे ते ठरवून साध्यही करता आले असते. आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगल असतं. हवं ते, ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेलं कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना! मी खचलो मुळीच नाही, फक्‍त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता! एमपीएससीच्या मायाजालात पडू नका, ‘जमलं तर हे इतरांपर्यंत पोहोचवा, अनेक जीव वाचतील,’ अशा शब्दात स्वप्नीलने स्पर्धा परीक्षांबाबत राज्य सरकारच्या चालढकल धोरणावर सुसाईट नोटमध्ये बोट ठेवलं होतं.

(आत्महत्यांना आळा घालण्यासाठी या आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईनचा वापर होऊ शकतो : 91-9820466726)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koregaon Society Election 2026 : कोरेगाव मतदारसंघात पुन्हा ईश्वर चिठ्ठीचा योगायोग; पाच वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती! 2021 मध्ये खत्री चिठ्ठीवर विजयी, तर 2026 मध्ये मानेंना नशिबाची साथ

Shambhuraj Desai Satara Bank Election Victory : सातारा जिल्हा बँकेत घडला इतिहास! स्व. शिवाजीराव देसाईंनंतर 45 वर्षांनी देसाई घराण्याची दमदार एन्ट्री; पालकमंत्र्यांचा उर आला भरुन

IND vs NZ, ODI: रोहित शर्मा न्यूझीलंडमध्ये घडवणार इतिहास? विश्वविक्रमांसह ७ मोठे पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : लडाख प्रशासनाने सोनम वांगचुक यांच्या एचआयएएलला बजावली नोटीस

Mhada House: फक्त २० लाखांत म्हाडा देणार १,४०० घरे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कोकण मंडळाचा पुढाकार

SCROLL FOR NEXT