महाराष्ट्र बातम्या

Swiggy लाही ग्राहकांची काळजी; विचारला भन्नाट प्रश्न

Swiggy ने घेतला प्रेमाचा आधार; युजर्सला विचारला आपुलकीचा प्रश्न

शर्वरी जोशी

भारतीय संस्कृतीमध्ये आजही घरी आलेल्या पाहुण्याला उपाशीपोटी कोणीही परत पाठवत नाही. त्यामुळे कोणतीही व्यक्ती भेटली की, काय जेवलात का? प्रश्न आवर्जुन विचारला जातो. विशेष म्हणजे प्रेमात पडलेल्या अनेक तरुणांच्या लव्हस्टोरीची सुरुवातही जेवलीस का? याच प्रश्नापासून होते. त्यामुळे जेवलीस का? किंवा जेवलास का? या प्रश्नाची गंमत काही औरच आहे. आता साधारणपणे आपल्या घरचे व्यक्ती, नातेवाईक किंवा प्रिय व्यक्ती हा प्रश्न विचारत असतात. परंतु, यावेळी चक्क Swiggy ने आपल्या ग्राहकांना हा प्रेमळ प्रश्न विचारला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर Swiggy ची चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे स्विगीने विचारलेल्या या प्रश्नावर युजर्सनेदेखील भन्नाट उत्तरं दिली आहेत. (swiggy-jevlis-ka-tweets-swiggy-marathi-people-goes-Crazy-reply)

प्रसिद्ध फूड अॅप कंपनी स्विगीने सोमवारी (७ जून) ट्विटरवर ‘जेवलीस का?’ हा प्रश्न विचारला आणि पाहता पाहता संपूर्ण सोशल नेटवर्किंगवर या प्रश्नाची तुफान चर्चा झाली. अनेक युजर्सने त्यावर काही मजेशीर मिम्सही शेअर केले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आलेले मिम्स कोणते ते पाहुयात.

दरम्यान, स्विगीने खास करुन मराठी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘जेवलीस का?’ हा प्रश्न विचारला आहे. तरुणाईच्या या प्रेम वाक्याचा आधार घेत स्विगीने भन्नाट पद्धतीने प्रमोशन केलं असून अनेकांचं मन जिंकून घेतलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indigo Flight: ''खरं कारण काय ते आत्ता सांगता येणार नाही..'', इंडिगोने DGCA ला काय उत्तर दिलं?

IND vs SA, T20I: टीम इंडियाचे दोन तगडे शिलेदार तंदुरुस्त होऊन परतले; सूर्याच्या बातमीने द. आफ्रिकेचे धाबे दणाणले

Indian Army : ले. कर्नल हर्षवर्धन ढेकणे यांनी पुतीन यांना दिली मानवंदना; निमगाव म्हाळुंगीचा अभिमान!

SMAT 2025: ११ चेंडूंत ५४ धावा! अजिंक्य रहाणे सुसाट... T20तील शतकापासून थोडक्यात वचिंत राहिला; मुंबईला मात्र विजय मिळवून दिला

Latest Marathi News Update: कन्नडमध्ये ६२ वर्षीय वृद्धाने घेतला गळफास

SCROLL FOR NEXT