Swine Flu Sakal
महाराष्ट्र बातम्या

Swine Flu: महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचा धोका वाढला; मलेरियानेही डोकं वर काढलं

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: राज्यभरात उष्मा वाढल्याने अचानक परत आलेल्या पावसामुळे हंगामी आजारांसाठी पोषक वातावरण आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागांत सोमवार (ता.७) पर्यंत स्वाइन फ्लूचे २,११३ रुग्ण आढळले असून ५३ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये नागपुरात सर्वाधिक २३ तर नाशिकमध्ये १९ रुग्णांचा समावेश आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरी आणि ग्रामीण भागांत स्वाइन फ्लूचे २,११३ रुग्ण आहेत. त्यापैकी ५३ रुग्णांचा मृत्यू झाला. अवघ्या एका महिन्यात ४९६ प्रकरणे समोर आली आहेत. तसेच महिनाभरात डेंगीच्या चार हजाराने रुग्णवाढ झाली आहे.

त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाले असून महाराष्ट्रात मलेरीयासाठी ८९, डेंगी आणि चिकन गुनियासाठी ५० असे एकूण १३९ सेंटिनल सेंटर कार्यान्वित केले आहेत. याचबरोबर जिल्हास्तरावर रॅपिड रिस्पॉन्स टीमच्या माध्यमातून रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी ४०१ वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर १,१८० गावांमध्ये औषध फवारणी, तलावांमध्ये गप्पी मासे अशा विविध उपाययोजना केल्या आहेत.

दहा महिन्यांतील आकडेवारी

आजार - रुग्णसंख्या
डेंगी - ३,७१३
जलजन्य - ३,०६९
चिकुनगुनिया - ४,०४०
कॉलरा - ४३८
गॅस्ट्रो - ४२३
कावीळ - ४६२
लेप्टो - ७८७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinay Kore Allegations Satej Patil : गोकुळमध्ये पैशांची पाकिटे वाटल्याचा सतेज पाटलांवर विनय कोरेंचा थेट आरोप; २५ उमेदवारांच्या नावाने पाकिटे असल्याचा दावा

EMI Rule: मेडिकल इमर्जन्सी किंवा पगार उशिरा आल्याने EMI चुकली? बँकेचे हे नियम माहीत आहेत का?

Rohit Sharma News: रोहितला पुन्हा Mumbai Indians चे कर्णधारपद देणे, ही भारतीय संघासाठी चिंतेची बाब; २०२७ वर्ल्ड कप जिंकण्याच्या स्वप्नांना धोका... कसा?

Maharashtra Live News : हायजॅकच्या धोक्याच्या सूचनेनंतर जयपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग

Assistant Engineer Arrested : कवठेमहांकाळ पंचायत समितीत ACB ची मोठी कारवाई; 17,400 रुपयांची लाच घेताना सहाय्यक अभियंता रंगेहाथ पकडला, कशासाठी मागितले पैसे?

SCROLL FOR NEXT