Kirit-Somaiya sakal
महाराष्ट्र बातम्या

सोमय्या पिता-पुत्रावर अटकेची टांगती तलवार

‘विक्रांत’ प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘आयएनएस विक्रांत’ युद्धनौका निधी गैरव्यवहार प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा नगरसेवक असलेला मुलगा नील यांना पोलिसांनी समन्स बजावले होते. त्यानुसार त्यांना शनिवारी (ता. ९) चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते; परंतु दोघेही गैरहजर राहिले. किरीट सोमय्या पूर्वनियोजित कामानिमित्त दिल्लीत असल्याचे कारण त्यांच्या वकिलांनी पोलिसांना दिले. दोघांना चौकशीला हजर राहण्यासाठी पुढील तारीख द्यावी, असे निवेदनही त्यांनी पोलिसांना दिले आहे.दरम्यान, सोमय्या पिता-पुत्रांनी अटकपूर्व जामिनासाठी विशेष सत्र न्यायालयात अर्ज केला असून सोमवारी (ता. ११) त्यावर सुनावणी होणार आहे.

आयएनएस विक्रांत युद्धनौका संवर्धनासाठी गोळा केलेल्या ५७ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांविरुद्ध ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सेवानिवृत्त लष्करी जवान बबन भोसले यांनी सोमय्या यांच्याविरोधात तक्रार केली आहे. त्याच्या तपासासाठी शनिवारी (ता. ९) ट्रॉम्बे पोलिसांनी दोघांना हजर राहण्याची नोटीस पाठवली होती. मात्र, सकाळी ११ वाजता दोघांचे वकील पोलिस ठाण्यात हजर झाले. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे सोमय्या हजर राहू शकले नाहीत. नील सोमय्या नगरसेवक असल्याने त्यांचेही काही कार्यक्रम ठरलेले होते. त्यामुळे तेही उपस्थित राहू शकले नाहीत, अशी माहिती त्यांचे वकील हृषिकेश मुंदारगी यांनी दिली. बुधवारी, १३ एप्रिलनंतर कोणत्याही दिवशी आम्हाला वेळ द्या, असे निवेदन वकिलांनी पोलिसांना दिले आहे. दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असल्याची माहितीही वकिलांनी दिली.

जामीन अर्जावर उद्या सुनावणी

किरीट आणि नील सोमय्या यांनी विशेष सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. सोमवारी (ता. ११) त्यावर सुनावणी होणार आहे. विक्रांत युद्धनौका संवर्धनासाठी निधी संकलनाप्रकरणी फसवणूक आणि विश्वासघात कलमांन्वये सोमय्या पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणी अटक होण्याच्या शक्यतेने दोघांनी सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी तातडीने अर्ज केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT