Uddhav Thackeray And Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का; 'शिवसेना' नावासह धनुष्यबाण चिन्ह गोठवले

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली- शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आता धनुष्यबाण चिन्ह वापरू शकणार नाही. मात्र पोटनिवडणुकीपर्यंतच चिन्ह गोठवण्यात आलं आहे. शिंदे गटासाठी ही जमेची बाब ठरू शकते. तर ठाकरे गटाला धक्का आहे. कारण अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवर असून शिंदे गटाचा उमेदावर नाही. याचा अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा होणार आहे. (Symbol of Shiv Sena Bow and Arrow has been fridged for election)

ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. तसेच संपूर्ण पक्ष माझ्यासोबत असल्याचं म्हणत शिवसेना पक्षावर आपला हक्क सादर केला होता. त्यामुळे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या पक्ष चिन्हाचा मुद्दा निवडणूक आयोगाकडे गेला होता. मात्र आज निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय़ घेतला आहे. शिवाय शिवसेना नाव दोन्हीही गटाला वापरता येणार नाही, हेही स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवलं असून ते रद्द केलेलं नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील निर्णय ठाकरे गटाच्या बाजुने गेल्यास धनुष्यबाण चिन्ह पुन्हा एकदा ठाकरे गटाला मिळू शकेल. मात्र या जर तरच्या बाबी आहे.

अंधेरी पूर्व येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी निवडणूक आयोगाला पत्र लिहून शिवसेनेच्या निवडणूक चिन्ह धनुष-बाणावर दावा सांगितला होता. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता निवडणूक चिन्हाचा हा वाद लवकर निकाली काढणे आवश्यक आहे. कारण उद्धव ठाकरे गट आपल्या उमेदवारांसाठी धनुष्य-बाण चिन्हावर दावा करू शकते, असंही पत्रात नमूद केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT