Uddhav Thackeray and Radhakrushn Vikhe Patil 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : सहानुभुतीने मत मिळत नाही, 'पाकिटं' द्यावे लागतात; विखे पाटलांचा ठाकरेंना टोला

सकाळ वृत्तसेवा

वैजापुर : हाथ जोडून रडल्याने सहानभूती मिळते मतदान मिळत नाही, निवडणुकीत मतदाराना 'पाकिट' वाटप करावेच लागते.तेव्हा निवडणूक जिंकली जाते. ‘माझे कुटुंब-तुमची जबाबदारी’ अशा पध्दतीने उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे फेसबुक लाईव्ह द्वारे मुख्यमंत्रीपद उपभोगून कारभार महाराष्ट्राचा कारभार ठप्प केला. त्यांना सामान्य जनतेचे प्रश्न कशी समजणार, अशा शब्दांत महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठाकरेवर टीकास्र सोडले.

वैजापूर येथे आठ कोटी ९४ लाख रुपये खर्चुन बांधण्यात येणाऱ्या तहसिल कार्यालयाच्या नविन प्रशासकीय इमारतीच्या शनिवारी ( ता.२०) भुमीपुजनच्या निमित्ताने झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.यावेळी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड, माजी सभापती हरिभाऊ बागडे, आमदार रमेश बोरणारे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे,पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया,तहसीलदार राहुल गायकवाड, व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मंत्री विखे म्हणाले, पाणंद रस्त्यांची कामे रेंगाळल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमालची वाहतुक करण्यासाठी अडचण येत आहे.‌ यापुढील काळात सर्व पाणंद रस्त्यांची कामे पुर्ण करुन त्यांना क्रमांक देण्यात येईल जेणेकरुन या रस्त्यांचे कायमस्वरुपी अस्तित्व राहील. त्यासाठी साठ ते सत्तर हजार कोटी रुपयांचा आराखडा विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. वैजापुरच्या तहसिल इमारतीचे एक वर्षात लोकार्पण करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली.

वाळु माफियांना वठणीवर आणु...

वाळु तस्करीला लगाम घालुन परवडेल अशा दरात वाळु उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकारने वाळु डेपोच्या माध्यमातुन सहाशे रुपये प्रति ब्रास या दराने वाळु देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, या निर्णयाची अंमलबजावणी करतांना वाळु तस्कर व त्यांना साथ देणारे प्रशासनातीलच काही अधिकारी आडकाठी करुन डेपो बंद करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. मात्र, सरकार कोणत्याही परिस्थितीत त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही. मोक्कासारखे कायदे लावुन त्यांना वठणीवर आणु असा सज्ज्ड दम विखे पाटिल यांनी दिला.

कराड व बागडे काय बोलले...

वैजापूर तालुक्यातील गोदावरी उपसा जलसिंचन योजनेचे कर्ज माफ करणे, विनायक सहकारी साखर कारखाना सुरु करणे, औद्योगिक वसाहत सुरु करणे, हॉस्पिटल अद्यावत करणे आदी प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रीस्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत अशी अपेक्षा केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड व हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली.

काही नेत्यांनी फिरवली पाठ...

निमंत्रण पत्रिकेवर अतुल सावे, अब्दुल सत्तार, संदीपान भूमरे, इम्तियाज जलील यांचे नाव होते.मात्र, कार्यक्रमाला ते आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT