Chandrashekhar Bawankule Esakal
महाराष्ट्र बातम्या

Chandrashekhar Bawankule: 'बातम्या एकतर्फी जाईल असं मी...', व्हायरल ऑडिओ क्लिपवर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क रहावं. पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, त्यांना ढाब्यावरही घेऊन जा, असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्याची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्हायरल ऑडिओ क्लिपवर स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असा दावा त्यांनी केला आहे. ते बोलताना म्हणाले की, 'चुकीच्या चर्चा, बातम्या येऊ नयेत. एखादी घटना घडली नाही. त्या घटनेच्या बातम्या येतात. छोटे-छोटे वेब पोर्टल अशा बातम्या चालवतात. कारण त्यांना माहिती पुर्ण नसते.'

'जर उद्या एखादी बातमी निगेटीव्ह केली. आमचं काही मत नाही तुमचा आधिकार आहे. पत्रकाराचा आधिकार आहे. पुर्ण स्वांतत्र्य आहे त्यांना पण, आमचं त्यावर काय मत आहे, तेही गेलं पाहिजे. जर मत जाणार नाहीत तर ते एकतर्फी जाईल असं मी म्हटलं आहे, आणि त्यात काही गैर नाही, असंही पुढे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

ऑडिओ क्लिपमध्ये बावनकुळे नेमकं काय म्हणाले आहेत?

"ज्या बुथवर तुम्ही काम कराल, तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले कोण आहेत, पोर्टल वाले कोण आहेत, प्रिंट मीडियावाले कोण आहेत हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतो, पण हे असे काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत, त्यांची यादी तयार करा, आपल्या बुथवर निगेटिव्हिटी होऊ द्यायची नाही, आपल्याविरुद्ध लिहू नये, विरोधात काही येणार नाही, याची काळजी घ्या, यात एक-दोन पोर्टल वाले, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक वाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे, हे समजलं असेल, त्यात काही कमी जास्त झाले तर सुजय विखे आहेतच."

"मिशन महाविजय 2024 पर्यंत बुथ संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही, याची काळजी घ्या, सर्व सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत याची काळजी घ्या."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT