talathi exam  esakal
महाराष्ट्र बातम्या

Talathi Exam : उद्याची तलाठी परीक्षा पुढे ढकलण्याची मुख्य सचिवांकडे मागणी; उमेदवारांची होतेय गैरसोय

संतोष कानडे

मुंबईः उद्या राज्यभरात तलाठी परीक्षेचा पेपर होत आहे. परंतु सध्या मराठा आरक्षणामुळे निर्माण झालेली स्थिती बघता, ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी होतेय. राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडेदेखील ही मागणी केलीय.

शुक्रवारपासून राज्यात मराठा आरक्षणाचा विषय पेटलेला आहे. अनेक शहरं बंद पुकारण्यात येत आहेत. शिवाय संतप्त आंदोलक आक्रमक मार्गाचा अवलंब करीत आहेत. काही ठिकाणी एसटी बसेस पेटवून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे उद्याची तलाठी भरती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी होतेय.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्य सचिवांकडे अशी मागणी केलीय. वडेट्टीवारांनी मुख्य सचिवांशी यासंदर्भात चर्चा केल्याचीही माहिती मिळतेय. शिवाय अनेक ठिकाणी एसटी बसेस बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. पुण्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या बस बंद आहेत.

महत्त्वाचं म्हणजे उद्याच्या परीक्षेसाठी विद्यार्थी परीक्षा केंद्राकडे आजच निघत आहेत, परंतु काहींना वाहनाची सोय होत नाहीये. तर काहीजण परीक्षा केंद्रावर दाखल झालेले आहेत. उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून तलाठी परीक्षेचा उद्याचा पेपर पुढे ढकलण्यात यावा, अशी मागणी करण्यात येतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balen Shah: पंतप्रधान बालेन शाह घटनात्मक परंपरा मोडत आहेत! नेमके आरोप काय? नेपाळच्या राजकारणात नवा वाद

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

Latest Marathi News Live Update: व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीसाठी शासनाची मंजुरी

Karnataka HIV student: कर्नाटकमध्ये खरंच सात हजार विद्यार्थ्यांना HIV लागण? 'एड्स प्रिव्हेंशन सोसायटी'कडून अधिकृत निवेदन जारी

SCROLL FOR NEXT