Udhayanidhi prakash ambedkar 
महाराष्ट्र बातम्या

Udhayanidhi: प्रकाश आंबेडकर यांचे उदयनिधी यांना समर्थन; एक शब्दात सांगितला 'सनातन'चा अर्थ

कार्तिक पुजारी

मुंबई- तमिळनाडूतील मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी केलेल्या वक्तव्यातून राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. भाजपने त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करुन त्यांच्यावर टीकेची झोड उठवलीये. काँग्रेसने या प्रकरणावर बचावात्मक पवित्रा घेतला आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उदयनिधी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी फेसबुकवर पोस्ट केली असून सनातनचा अर्थ एका शब्दांत सांगितला आहे. सनातन म्हणजे छुआछूत (अस्पृशता) असं ते म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी कोणाचे नाव न घेता ही पोस्ट केली आहे. पण, सध्या सनातन या शब्दावरुन सुरु असलेला गोंधळ पाहता त्यांनी उदयनिधी यांना पाठिंबा दिल्याचे स्पष्ट होत आहे.

उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी एका कार्यक्रमात भाष्य केलं होतं. सनातन धर्म हा कोरोना, डेंगु, मलेरिया सारखा आहे. यांचे जसे आपण निर्मुलन करतो तसेच सनातन धर्माचे आपणाला निर्मुलन करावे लागेल. सनातन धर्माला विरोध करुन काही फायदा होणार नाही. समाजात समानता स्थापित करायची असेल तर सनातनला संपूर्ण नष्ट करावे लागेल, असं ते म्हणाले होते.

उदयनिधी यांच्या वक्तव्यानंतर देशभर त्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपच्या नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन उदयनिधी यांना लक्ष्य करण्याचा धडाका लावला आहे. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनीही यावर भाष्य केलं असून हिंदू द्वेषातून हे झाल्याचं ते म्हणाले आहेत. काँग्रेसने सावध भूमिका घेतली असून पक्षात दोन गट पडल्याचं दिसतंय. दरम्यान, उदयनिधी यांनी सोमवारी बोलताना आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं वक्तव्य केलं. मी पुन्हा पुन्हा याचा उल्लेख करेन, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rawdogging Boredom: 'काहीही न करता बसणं' बनलं ट्रेंड! Gen Z चा "Rawdogging Boredom" फंडा आहे तरी काय?

IPL 2026: 'तो' ड्रेसिंग रूममधून पळत आला, डेव्हिड मिलरला फलंदाजीला जाण्यास रोखले अन्... DC च्या डग आऊटमधील Video Viral

SCROLL FOR NEXT