solapur city police

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

तमिळनाडूतील छत्री गॅंगचा पर्दाफाश! एक कारची काच फोडायचा, दुसरा चोरी करायचा अन्‌ बाकीचे पाळत ठेवायचे; सोलापूर फौजदार चावडी पोलिसांनी २५०० किमी प्रवास केला, पण ७ जणांना शोधलेच, वाचा...

सायकलीच्या बेरिंगमधील छऱ्ऱ्यांना रबर लावून कारच्या काचा फोडून आतील लॅपटॉप, रोकड लंपास करणारी छत्री गॅंग फौजदार चावडी पोलिसांनी जेरबंद केली आहे. या कारवाईत तामिळनाडूतील ७ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून ३ लाखांची रोकड, लॅपटॉप व कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : एकजण सायकलीच्या बेरिंगमधील छऱ्ऱ्याला (बेरिंगमधील छोटी गोळी) रबर लावून जोरात काचेवर मारायचा. काच टचकल्यावर दुसरा येऊन काचेला हात मारून ती पूर्ण फोडायचा. तो पुढे निघून गेल्यावर तिसरा मागून यायचा आणि कारमधील साहित्य चोरून न्यायचा. त्यावेळी बाकीचे सहकारी आसपास लक्ष ठेवून असायचे. चोरीचा प्लॅन यशस्वी झाल्यावर एक एक करून सगळेजण पसार व्हायचे, अशी त्यांची चोरीची कार्यपद्धती होती. ही छत्री गॅंग फौजदार चावडी पोलिसांनी जेरबंद केली आहे. या कारवाईत तामिळनाडूतील ७ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून ३ लाखांची रोकड, लॅपटॉप व कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. चोरी करताना कोणाचेही लक्ष आपल्याकडे जाणार नाही, यासाठी गॅंगमधील प्रत्येकजण हाती छत्री घ्यायचे.

पार्क चौकातील आयसीआयसी बॅंकेसमोरील सार्वजनिक रोडवर प्रफुल्लकुमार शिवाजी शिर्के (रा. गारपीर वाडी, फलटण) यांनी ६ जुलैला कार उभी केली होती. चोरट्यांनी त्यांच्या कारची काच फोडून आतील लॅपटॉप व कागदपत्रे चोरून नेली होती. २८ जुलैला पुन्हा ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरासमोरील रोडवर उभ्या कारची काच तशाच पद्धतीने फोडून चोरट्यांनी चार लाखांची रोकड असलेली बॅग चोरली होती. फौजदार चावडी पोलिसांत दोन गुन्हे दाखल झाले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत, पोलिस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकप्रमुख सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या पथकाने घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज व चोरट्यांची ‘मोडस ऑपरेंडी’ (कार्यपद्धती) अभ्यासली. खबऱ्यांचे नेटवर्क वापरून चोरट्यांचा शोध सुरू केला.

तपासादरम्यान संशयित मिरज, आळंदी, पुणे अशा विविध ठिकाणी पसार होत होते. ६ ऑगस्ट रोजी छत्री गॅंग पुन्हा सोलापुरात आल्याची खबर मिळाली आणि पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. षण्मुगम अमरानाथन, आदिथन थंडयुथपाणी, सेरन मुकुंधन, आनंद विश्वनाथन, जगन बालसुब्रमण्य, मनोजकुमार अनबलगन (सर्वजण रा. रामजी नगर, तिरूचिरापल्ली, तमिळनाडू) आणि कमलकन्नन गणसेन (रा. कल्लिकुड्डी, जि. तिरुचिरापल्ली, तामिळनाडू) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

तपासासाठी पोलिसांनी घेतली दुभाषकाची मदत

तपास पथकाने गॅंगचा पर्दापाश करण्यासाठी तब्बल २५०० किलोमीटरचा प्रवास केला. गॅंगमधील ७ जण सराईत चोर असून त्यांच्याविरूद्ध सोलापूर शहरात दोन, मिरा-भाईंदर (बोळिंज), तुळजापूर, दिघी (पिंपरी चिंचवड), महांकाली व पंजागुट्टा (हैदराबाद) असे ७ गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले. न्यायालयाने त्यांना पहिल्यांदा दोन दिवसांची, त्यानंतर पाच दिवसांची कोठडी ठोठावली. तपासावेळी चोरटे ‘तमिळ’शिवाय दुसरी भाषाच बोलत नव्हते. यामुळे पोलिसांना दुभाषकाची मदत घेऊन तपास पूर्ण केला. ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त प्रीतम यावलकर, सहायक पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकप्रमुख श्री. क्षीरसागर यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कामगिरी पार पाडली.

पोलिस आयुक्तांनी केला दोन दिवस तपास; कोर्टानेही बोलावला दुभाषक

सात जणांकडे एकच फोन, तोही ८ दिवसातून ऑन करायचे, जेणेकरून पोलिसांना आपला ठावठिकाणा लागणार नाही, याची खबरदारी त्यांनी घेतली होती. तमिळनाडूतील रामजी नगरातील काही गॅंग अशाच वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये चोरी करतात. यातील एक गॅंग सोलापूर शहरात वावरत होती. तिसऱ्यांदा चोरीच्या उद्देशाने आल्यानंतर त्यांना पोलिसांनी जेरबंद केले. खुद्द पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी स्वत: संशयितांकडे दोन दिवस तपास केला. संशयितांना न्यायालयात हजर केल्यावर न्यायाधीशांनी देखील दुभाषकाला बोलावून त्यांच्याकडे विचारपूस केल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT