Tanaji Sawant vs Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेचा सावंतांना मोठा धक्का; सोलापूरच्या जिल्हा संपर्क पदावरून केली हकालपट्टी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानं बंड केल्यामुळं शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागलीय.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानं बंड केल्यामुळं शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागलीय.

मुंबई : शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटानं बंड केल्यामुळं शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली. ती अजूनही सुरूच आहे. आता शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती आहे.

शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांची शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क पदावरुन हकालपट्टी करण्यात आलीय. त्यांच्या जागी आता सोलापूर जिल्हा संपर्क पदावर अनिल कोकीळ (Anil Kokil) यांची नियुक्ती करण्यात आलीय. सावंत यांची हकालपट्टी आणि अनिल कोकीळ यांची नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशानं करण्यात आल्याची माहिती सामनातून देण्यात आलीय.

अर्जुन खोतकरांची शिवसेना उपनेतेपदी निवड

एक दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आलीय. अशी माहिती एका पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आलीय. त्याचबरोबर विजय नाहटा आणि विजय चौगुले यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं माहिती पत्रकात देण्यात आलीय. त्यामुळं येणाऱ्या काळात शिवसेनेत अनेक नेत्यांची वरिष्ठ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गासाठी सरकारचा आक्रमक निर्णय! कोल्हापूरला वगळून भूसंपादनास हिरवा कंदील, मोठा निधी मंजूर

Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! गणेशोत्सवानिमित्त रात्री 'या' वेळेपर्यंत चालणार मेट्रो; कसं आहे नियोजन?

Latest Marathi News Updates : कारंजात जोरदार पर्जन्यवृष्टी, शहरातील रस्ते जलमय

बाबो! ठरलं तर मग मालिकेतील अर्जुनने दिली गुड न्यूज, पत्नी श्रद्धा म्हणाली...'बाप्पाने वर्षाभरात इच्छा पूर्ण केली.'

Jalgaon Ganeshotsav 2025 : जळगावात गणेशोत्सवासाठी पोलिस दल सज्ज; 'डीजे'ला मिरवणुकीतून 'आउट'

SCROLL FOR NEXT