Tanaji Sawant letter for tukaram mundhe transfer from health department reasons for tukaram mundhe transfer  sakal
महाराष्ट्र बातम्या

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या बदलीमागे तानाजी सावंत? 'त्या' पत्रातून मोठा खुलासा

सकाळ डिजिटल टीम

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे हे त्यांच्या कार्यशैलीसोबत त्यांच्या सतत होणाऱ्या बदल्यांमुळे प्रसिध्द आहेत. दरम्यान आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची काही दिवसांपूर्वी पुन्हा बदली झाली आहे. कुटुंब कल्याण विभागाच्या संचालकपदावरून मुंढेंची बदली करण्यात आली. दरम्यान तुकाराम मुंढे याच्या बदलीसाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी पत्र लिहून मागणी केल्याचे समोर आलू आहे.

तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी मंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र लिहिलं होतं अशी माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना मुंढे धमकावत असल्याची तक्रार तानाजी सावंत यांनी या पत्रात केली आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिलं आहे.

हेही वाचा - सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

तानाजी सावंत यांनी मुंढेच्या बदलीमागे त्यांचा हात नसल्याचे म्हटले होते. ही प्रशासकिय बदली असल्याचे तानाजी सावंत म्हणाले होते. तानाजी सावंत यांनी पाठवलेलं हे पत्र ९ नोव्हेंबर या तारखेचं असून हे पत्र १४ नोव्हेंबरला मुख्यमंत्री कार्यालयात इनवर्ड झालं. त्यानंतर या पत्रावर शेरा देण्यात आला की या प्रकरणी अहवाल सादर करा आणि त्यानंतर तानाजी सावंत यांच्या पत्रावर तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली.

सावंतांनी पत्रात काय म्हटलंय?

तुकाराम मुंढे यांनी ठाण्यात कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंता पदावर असणाऱ्या विशिष्ठ आधिकाऱ्याला त्यांना न विचारता खात्यातून बाजूला केलं. तसेच तुकाराम मुंढे हे आपलं काही ऐकत नाहीत, त्यामुळे आरोग्य खातं आणि महाराष्ट्र सरकारची बदनामी होईल असे तानाजी सावंत यांनी पत्रात म्हटलं आहे. या पूर्वी देखील मुख्यमंत्र्याच्या समोर तुमचं काम सुधारा असे तुकाराम मुंढे यांना सांगण्यात आलं होतं असं देखील सावंत यांनी या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर सोशल मिडीयावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या होत्या. तसेच तुकाराम मुढे यांची बदली हा चर्चेचा विषय ठरला होता. मंत्री तानाजी सावंत यांनी यापूर्वी या बदलीमागे त्यांचा हात नसल्याचे सांगितले होते. मात्र आता त्यांचे पत्र बाहेर आल्याने आता तानाजी सावंत यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT