Tanaji Sawant Video On Ajit Pawar NCP Esakal
महाराष्ट्र बातम्या

Tanaji Sawant Video: तानाजी सावंत राष्ट्रवादीबाबत नेमकं काय म्हणाले? ज्यामुळे महायुतीत पेटलं राजकारण, व्हिडिओ व्हायरल

Tanaji Sawant Viral Video: डॉ. तानाजी सावंत यांच्या जुन्या वादग्रस्त भाषणाचे व्हिडिओ समाज माध्यमावर पोस्ट होत असल्याने निवडणुकीच्या आधीच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

आशुतोष मसगौंडे

बिनधास्त बोलण्यासाठी राज्यात ओळखले जाणारे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या जुन्या वादग्रस्त भाषणाचे व्हिडिओ समाज माध्यमावर पोस्ट होत असल्याने निवडणुकीच्या आधीच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कधी विरोधकांच्या फायद्याचे तर कधी महायुतीत तणावाचे वातावरण निर्माण होत आहे.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करणारा सावंत यांचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

'काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत माझे कधीही जमले नाही. आज जरी मंत्रिमंडळात बैठकीला मांडीला मांडी लावून बसलो तरी उलटी आल्यासारखे होते', असे या व्हिडिओत सावंत म्हणत असल्याचे दिसत आहे.

भूम-परंडा विधानसभा मतदारसंघातील विरोधकांवर सडकून टीका करणाऱ्या पालकमंत्री डॉ. सावंत यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक वेळा टीका केली आहे. धरण फुटण्याचे कारण देताना केलेले वक्तव्य त्यांना त्रासदायक ठरत आहे.

यातच महायुतीत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर डॉ. सावंत यांनी एका कार्यक्रमात केलेली टीका गुरुवारी (ता. २९) समाज माध्यमावर आल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र, असे समाज माध्यमावर येणारे व्हिडिओ कोणत्या गावचे आहेत? कोणत्या कार्यक्रमातील आहेत ? कधीचे आहेत? हे मात्र अनेक वेळा कळत नसल्याने समाज माध्यमातून संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे.

यापुढेही डॉ. सावंत यांचे असेच वादग्रस्त जुने व्हिडिओ पुन्हा येऊन राज्याचे राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

धाराशिव शिवसेनेचे समन्वयक गौतम लटके म्हणाले, "मतदारसंघातील विकासकामांची धास्ती विरोधकांनी घेतली आहे. त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीही नसल्यामुळे असे व्हिडिओ विरोधकांकडून व्हायरल केले जात आहेत. आणि त्यातून संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. मतदारसंघातील जनतेचा डॉ. सावंत यांच्यावर विश्वास आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charges : 15 सप्टेंबरच्या निर्णयानंतर UPI पेमेंटवर MDR शुल्क; PhonePe-Google Payच्या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता

Diwali Railway Tickets : दिवाळीच्या रेल्वे तिकिटांना आतापासूनच प्रतीक्षा ; आरक्षण सुरू होताच पाच मिनिटांत ‘रिग्रेट’; लांब पल्ल्याच्या गाड्यांना मागणी

Pune Bridge Repairs : पुण्यातील २१ पुलांची दुरुस्ती आयुर्मान वाढण्यास मदत; दरवर्षी होणार नियमित तपासणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्र्यांचा आजपासून दुष्काळ पाहणी दौरा

Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT