Tanaji Sawant Video 
महाराष्ट्र बातम्या

Tanaji Sawant Video: "मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही, कुणी राडा केला तर..."; तानाजी सावंतांच्या वक्तव्याने खळबळ

पोलीस अधीक्षकांना झापताना तानाजी सावंत यांची जीभ घसरली

Sandip Kapde

Tanaji Sawant Video: आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलात व्हायरल होत आहेत. धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यावर तानाजी सावंत दबाव टाकताना दिसत आहेत. सावंत यांनी यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. दरम्यान त्यांनी स्वत:ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा मोठं असल्याचं दाखवलं आहे.

धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यावर दबाव टाकताना तानाजी सावंत म्हणाले, "आपण मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही, नो डिस्कस, करायचे म्हणजे करायचे, मी सांगेल तेच करायचे."

सावंतांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यावर खासदार राहुल शेवाळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तानाजी सावंत याचा
खुलासा करतील, असे शेवाळे म्हणाले.

सुषमा अंधारे यांनी देखील गुहखात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. "गृहखात्याची अवस्था कोणीही यावं आणि टपली मारून जावं, अशी झाली कधी कुख्यात गुन्हेगार गुंड पोलिसांना तालावर नाचवतात तर कधी सरकार दरबारचे मंत्री सरेआम इज्जत काढतात," असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

व्हिडिओमध्ये नेमकं काय?

तानाजी सावंत धाराशीवचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना एक काम सांगत होते. त्यावर अतुल कुलकर्णी यांनी चर्चा करु असं म्हणतात. मात्र तानाजी सावंत म्हणतात, "नो डिस्कस, मी सांगितले तर करायचे म्हणजे करायचे, मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही तर बाकी काय. कुणी राडा केला तर उचलून फेकू, नंतरचे नंतर बघू"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT