0Water_1_40.jpg 
महाराष्ट्र बातम्या

उन्हाळ्याच्या सुरवातीला 'या' जिल्ह्यांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा ! 23 जिल्ह्यांचा टंचाई आराखडाच नाही

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील धरणासह मध्यम व लघू प्रकल्पासह विहिरीतील पाणीपातळी खालावू लागली आहे. पालघर, ठाणे, बुलडाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमधील पाच गावे, 16 वाड्यांवर नऊ तर सोलापूर शहरात 21 टॅंकर सुरू झाले आहेत. संभाव्य टंचाईवर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा शासनाला पाठविणे बंधनकारक आहे. मात्र, राज्यातील नाशिक, औरंगाबाद, नागपूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, कोल्हापूर, सांगली, सातारा यासह 23 जिल्ह्यांचा टंचाई आराखडाच शासनाला पाठविला नसल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

संभाव्य टंचाईची स्थिती... 
टंचाईग्रस्त गावे 
9,272 
अंदाजित टॅंकर 
680 
टंचाई आराखडा 
400 कोटी 
नळ-पाणीपुरवठा योजना दुरुस्ती 
92 कोटी 

पावसाळा संपल्यानंतर भूजल सर्व्हेक्षण विभागाकडून प्रत्येक तालुक्‍यातील निरीक्षण विहिरीतील पाणीपातळीचा अंदाज घेऊन त्याचा अहवाल पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला दिला जातो. त्यानुसार ऑक्‍टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या प्रत्येकी तीन महिन्यांतील टंचाईचा संभाव्य आराखडा तयार केला जातो. मात्र, उन्हाळा सुरु झाला, तरीही यंदा हे आराखडे तयार झाले नसल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या भागातील टंचाईचा आढावा घेऊन संभाव्य कृती आराखडा तयार करून तो शासनाला सादर करणे बंधनकारक आहे. तरीही अवघ्या 13 जिल्ह्यांनीच शासनाकडे टंचाई कृती आराखडा पाठविला असून राज्याचाही टंचाई आराखडा अंतिम झालेला नाही, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे अनेक गावांमधील नळ तथा पाणीपुरवठ्याच्या योजनांची दुरुस्तीस अडचणी येत आहेत. सोलापूर जिल्ह्यात टॅंकर सुरु झाला नाही, परंतु शहरातील ठराविक भागातील नागरिकांना सातत्याने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दुसरीकडे उजनी धरण 100 टक्‍के भरलेले असतानाही आता धरणाने तळ गाठायला सुरवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडण्याचे नियोजन बदलण्यात आले आहे. जिल्ह्यातील संभाव्य टंचाईचा विचार करून आता एकच आवर्तन सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. 


पाईपलाईन नसल्याने सुरु आहेत टॅंकर 
सोलापूर शहरात सध्या 21 टॅंकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. पाईपलाईन नसलेल्या ठिकाणी प्राधान्याने हे टॅंकर सुरु असून नागरिकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. प्रत्येक कुटुंबासाठी एकावेळी एक हजार लिटरपर्यंत पाणी दिले जाते. 
-सिध्देश्‍वर उस्तुरगी, अभियंता, पाणीपुरवठा व आरोग्य, महापालिका, सोलापूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

Parbhani food Safety Raid: परभणीत अन्न सुरक्षा विभागाचा छापा; पेढीचा परवाना निलंबित, २१५ किलो मिल्क पावडर जप्त

Marathi News Live Updates : कमीत कमी प्रदूषण अन् शक्य तितक्या पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करू : मुख्यमंत्री फडणवीस

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

SCROLL FOR NEXT