Teacher Day 5 September  
महाराष्ट्र बातम्या

यंदा ‘शिक्षक दिनी’ पुरस्कार नाही

राज्यातील शिक्षकांच्या पुरस्काराची अंतिम यादी अनिश्चित

सकाळ वृत्तसेवा

नंदोरी : केंद्र शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची घोषणा करण्यात आली. त्यात राज्यातील तीन शिक्षकांचा समावेश आहे. मात्र, राज्यातील शिक्षकांच्या पुरस्काराची अंतिम यादी अद्याप निश्चित झाली नाही. त्यामुळे यंदा राज्यातील आदर्श शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचा ‘शिक्षक दिन’ ५ सप्टेंबरचा मुहूर्त हुकला आहे.

२०२१-२२च्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराच्या निवड प्रक्रियेसाठी राज्य निवड समितीवर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असलेल्या दोन अशासकीय सदस्यांची नियुक्तीच २९ ऑगस्टला करण्यात आली.

शिक्षक दिनाच्या आठ दिवसांपूर्वी ही नियुक्ती करण्यात आल्याने यंदा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा मुहूर्त हुकणार हे निश्चितच होते. राज्यातील १०९ शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी यंदा अद्याप नावे निश्चित झाली नाहीत.

दोन वर्षांपासून पुरस्कार रखडले

कोरोना साथीच्या काळात शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू होते. शिक्षकांनी शिक्षणात खंड पडू दिला नाही. मात्र, गत दोन वर्षे राज्यातील शिक्षकांना आदर्श पुरस्कार मिळालाच नाही. गेली दोन वर्षे राज्यातील शिक्षक पुरस्कारापासून वंचित राहीले. आदर्श शिक्षक पुरस्कार छाननी समितीवर दोन अशासकीय तज्ज्ञांची निवड केल्याने अद्याप अंतिम यादी झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अस्थिबोध : एमआरआय म्हणजे काय?

२३ जून २०२६ पंचांग! महेशनवमी, दुर्गापूजन आणि शुभ मुहूर्तांची संपूर्ण माहिती

Sadhguru's Peanut Milkshake: “फक्त एक मूठ शेंगदाणे आणि ५ तास भूक नाही!”; सद्गुरूंनी सांगितला सर्वात सोपा नाश्ता

ARG vs Austria : लिओनेल मेस्सीचा विश्वविक्रमी गोल पाहिलात का? ज्याने अर्जेंटिनाला Fifa World Cup च्या पुढील फेरीत पोहोचवले Video Viral

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

SCROLL FOR NEXT