Teacher recruitment after nine years
Teacher recruitment after nine years 
महाराष्ट्र

नऊ वर्षांनंतर मिळाला शिक्षक भरतीला मुहूर्त

रोशन भामरे

नाशिक - राज्यात तब्बल नऊ वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त मिळाला असून, येत्या ९ पासून पवित्र पोर्टलवरूनच राज्यात १२ हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळावर शुक्रवारी याबाबत सूचना झळकली. त्यानुसार ९ ऑगस्टला सायंकाळी पाचनंतर मुलाखतीशिवायचा प्राधान्यक्रम दिलेल्या उमेदवारांना त्यांनी निवडलेल्या प्राधान्य क्रमानुसार संस्थांसाठीच्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १६ ऑगस्टला सायंकाळी पाचनंतर मुलाखतीसह प्राधान्यक्रम दिलेल्या उमेदवारांनी निवडलेल्या प्राधान्य क्रमानुसार संस्थांसाठीच्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दोन वर्षांचा डी. एड., बी. एड. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरदेखील सरकारने प्रथम टीईटी, त्यानंतर अभियोगता चाचणी असे टप्पे भरतीसाठी ठरविले होते. त्याप्रमाणे तरुणांनी दोन्ही परीक्षांमध्ये गुणवत्ता सिद्ध केली. त्यातून राज्यभरातील ८४ हजार गुणवत्ताधारक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. 

दरम्यान, शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे घेण्याची घोषणा होऊनही जवळपास दोन वर्षे उलटली तरी प्रशासकीय तर कधी तांत्रिक बाबींमध्ये अडकलेली ही प्रक्रिया कधी पूर्ण होते याकडे उमेदवारांचे लक्ष लागले होते. महिन्यापूर्वीच राज्यातील ८४ हजार ४१३ उमेदवारांनी मध्यम, विषय, गुणनिहाय प्राधान्यक्रम दिले होते. त्यात शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित संस्थासाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र प्राधान्यक्रमाची प्रक्रिया झाली. उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून आपली संपूर्ण माहिती पवित्र पोर्टलवर भरलेली होती.

नियुक्तीपत्रावरील तात्पुरत्या स्थगितीविषयी व निवड यादी पारदर्शक पद्धतीने लागावी यासाठी शिक्षण आयुक्त व मंत्र्यांची भेट घेणार आहेत. 
- संतोष मगर, अध्यक्ष, डी. टी. एड., बी. एड्‌. स्टुडंट असोसिएशन
 

नियुक्तीपत्रांविषयी अनिश्‍चितता  
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सध्या भरतीतील उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याविषयी तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. त्याबाबत न्यायालयात पुढील सुनावणीत काय निर्णय होतो आणि त्यानंतर सरकार कोणती पावले उचलेल, याकडेही उमेदवारांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे भावी शिक्षकांचा मार्ग सुखकर होईल का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT