teacher esakal
महाराष्ट्र बातम्या

TET पेक्षाही शिक्षक भरती घोटाळा मोठा - शिक्षण तज्ञ

TET पेक्षाही शिक्षक भरती घोटाळा मोठा - शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : सध्या टीईटी घोटाळा (TET scam) गाजतो आहे, पण यापेक्षाही मोठा शिक्षकभरती घोटाळा (Teacher recruitment scam) महाराष्ट्रात झाला आहे. दुर्दैवाने त्याची चर्चा झाली नाही. टीईटी पास नसलेले हजारो शिक्षक सेवेत घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

टीईटीची अट २०१३ ला लागू झाली व २०१३ ला शिक्षकभरती बंद झाली. यातून पळवाट काढत शिक्षक २०१२ पूर्वी आमच्या शाळेत काम करीत होते, असे रेकॉर्ड तयार करून अधिकाऱ्यांना पैसे देऊन शिक्षकांना मान्यता मिळविल्या व ते हजारो शिक्षक आज सेवेत रूजू केले आहेत व असे प्रत्येक जिल्ह्यात ५०० पेक्षा जास्त शिक्षक आहेत. शिक्षकांच्या सह्या असलेले हजेरीपुस्तक २०१२ पूर्वीपासून दाखवायचे आणि ते शिक्षक २०१२ पासून नोकरीत होते. त्यामुळे ते शिक्षक भरतीपूर्वी कामाला होते, असे रेकॉर्ड तयार करायचे. त्याला शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता मिळविली. त्याला मंत्रालय स्तरावरून मान्यता दिल्या गेल्या व हे शिक्षक इयत्ता नवीवी व दहावीला शिकवीत होते, असे दाखवून टीईटीतून सूट मिळवून घेतली.

''हा घोटाळा उघड करण्याचा सोपा मार्ग म्हणजे २०१२ नंतर शिक्षक भरती बंद असताना, २०१२ नंतर जिल्ह्यात नवे शिक्षक किती भरती झाले, ही संख्या घेतली की हा घोटाळा उघड होईल. त्याकाळात अतिरिक्त शिक्षक उपलब्ध असताना व शिक्षकभरती बंद असताना ही शिक्षकभरती झाली कशी? टीईटी पास नसताना हे शिक्षक या व्यवस्थेत कसे आले, हा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारायला हवा.'' - हेरंब कुलकर्णी, शिक्षण तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, DC vs PBSK: दिल्लीने उभारल्या IPL 2026 मधील सर्वोच्च धावा! केएल राहुलचं वादळी दीडशतक अन् नितीश राणासोबत विक्रमी पार्टनरशीप

Mumbai News: मुंबईत २७ वर्षांनंतर सूडाची थरारक कहाणी! दया नायकांकडून काकाचा एनकाउंटर; बदल्यातून पुतण्याने खबऱ्याला क्रूरपणे संपवलं

Solapur Crime News: ९० हजारांच्या बनावट लुटीचा पर्दाफाश; फिर्यादीच निघाला द्राक्ष खरेदीच्या रकमेचा चोर

Solar Power Extra Charges: स्व-उपभोग सौर विजेवर अतिरिक्त शुल्काचा प्रस्ताव; ग्राहक पंचायतीचा तीव्र विरोध, राज्यभर जनजागृती व आंदोलनाची चेतावणी

Pachod News : दुधाच्या हव्यासापोटी ऑक्सिटोसिन इंजेक्शनांचा ग्रामिण भागात सर्रास वापर

SCROLL FOR NEXT