zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

बदलीसाठी शिक्षकांकडे बनावट मेडिकल सर्टिफिकेट? ‘या’ ४३ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची होणार फेरतपासणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे मुंबईतील जे. जे. रुग्णालयास पत्र

जिल्हांतर्गत बदलीत संवर्ग एकमधून बदली झालेल्या ४३ शिक्षकांसह त्यांच्या नातेवाइकांची मुंबईच्या जे. जे. रुग्णालयाकडून वैद्यकीय फेरतपासणी होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी शनिवारी (ता. २६) याबाबतचा आदेश काढला आहे. तसे पत्र जे. जे. रुग्णालयाला दिले आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : जिल्हांतर्गत बदलीत संवर्ग एकमधून बदली झालेल्या ४३ शिक्षकांसह त्यांच्या नातेवाइकांची मुंबईच्या जे. जे. रुग्णालयाकडून वैद्यकीय फेरतपासणी होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी शनिवारी (ता. २६) याबाबतचा आदेश काढला आहे. तसे पत्र जे. जे. रुग्णालयाला दिले आहे.

जिल्हांतर्गत बदलीत संवर्ग एकमधून सोयीच्या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी अनेक प्राथमिक शिक्षकांनी आजारी व दिव्यांग असल्याचे बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविले आहे, अशी तक्रार बार्शी तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयाशी पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्या रुग्णालयाने सरकारी निर्णयाचा संदर्भ देत स्थानिक सरकारी रुग्णालयाकडून वैद्यकीय फेरतपासणी करून घेण्याविषयी कळवले होते. त्यानुसार येथील 'सिव्हिल हॉस्पिटल'मधून वैद्यकीय फेरतपासणी करण्यात आली. त्यात गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत शिक्षक संजय पाटील, अनिल देशपांडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांच्याकडे पुन्हा तक्रार केली होती.

तर वैद्यकीय फेरतपासणीबाबत साशंकता असल्यास जे. जे. रुग्णालयाकडून पुन्हा वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी स्पष्ट केले होते. तक्रारीवर मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी सुनावणी घेतली होती. त्यात योग्य कार्यवाही करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले होते. त्यानुसार ४३ शिक्षकांसह त्यांच्या नातेवाइकांची पुन्हा वैद्यकीय तपासणी करावी, असा पत्रव्यवहार त्यांनी जे. जे. रुग्णालयाशी केला आहे.

फेरतपासणीनंतर होणार कारवाई

संवर्ग एकमधून बदली प्रक्रिया समुपदेशनाने पूर्ण झाली आहे. त्यातील ४३ शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राबाबत तक्रारदारांनी साशंकता व्यक्त करत आव्हान दिले होते. यात शिक्षकांसह त्यांच्या पत्नी, पाल्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांचा समावेश आहे. जे. जे. रुग्णालयाच्या वैद्यकीय फेरतपासणीत एखाद्या शिक्षकाने सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस असल्याचे आढळल्यास त्यावर कारवाई होऊ शकते.

संवर्ग- एकमधून शिक्षक बदलीची आकडेवारी

  • अर्ज केलेले : ६८८

  • नकार दिलेले : ३४

  • बदली झालेले : ६५४

  • मराठी माध्यम : ६२६

  • कन्नड माध्यम : १७

  • उर्दू माध्यम : ११

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 5th Test: अरे, ही काय फालतुगिरी! Shubman Gill ला घाई नडली, झाला OUT; गौतम गंभीर चिडला Video

Suresh Dhas: परळीत आणखी एक खून प्रकरण! बालाजी मुंडेंची हत्या कुणी केली? खरा खुनी सोडून ड्रायव्हरला केलं आरोपी; धसांचा गौप्यस्फोट

Malegaon Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोटातील ते दोन ‘वाँन्टेड’ आरोपी आहेत तरी कोण?, ज्यांना 'NIA'ने 'बेपत्ता' ठरवलंय!

Pro Kabaddi 12 Schedule: प्रो कबड्डीच्या १२ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर! 'या' चार शहरांमध्ये रंगणार लढती

Latest Maharashtra News Updates : हरणांच्या मृत्यूप्रकरणी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

SCROLL FOR NEXT