schools teachers

 
sakal
महाराष्ट्र बातम्या

शिक्षकांच्या पगारी थांबल्या! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ २१३ माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षकांची पगारबिलं अपलोड होईनात; ‘ही’ आहेत कारणे

शालेय शिक्षण विभागाच्या नव्या आदेशानुसार आता शाळांची संचमान्यता पूर्ण झाली आहे का, त्यांच्या सेवकसंचातील पदे व कार्यरत पदे किती आहेत, प्रत्येक शाळेतील कर्मचाऱ्यांची माहिती शिक्षण विभागाच्या पोर्टलवर अपलोड केली आहे का, या बाबी तपासल्या जात आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या एकूण ९८१ शाळा आहेत. त्यापैकी २१३ शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार अजूनही झालेला नाही. संचमान्यतेतील पदांपेक्षा कार्यरत पदे जास्त, संचमान्यता अपूर्ण, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे डिजिटलायझेशन केले नाही, अशा कारणांमुळे पगारी थांबल्याचे समोर आले आहे.

सोलापूर जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण विभागाकडील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये सुमारे १४ हजार ५०० शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आहेत. त्या सर्वांच्या वेतनासाठी दरमहा १२५ कोटी रुपये लागतात. आता मार्च महिन्याच्या वेतनासाठी तेवढा निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. परंतु, शालेय शिक्षण विभागाच्या नव्या आदेशानुसार आता शाळांची संचमान्यता पूर्ण झाली आहे का, त्यांच्या सेवकसंचातील पदे व कार्यरत पदे किती आहेत, प्रत्येक शाळेतील कर्मचाऱ्यांची माहिती शिक्षण विभागाच्या पोर्टलवर अपलोड केली आहे का, या बाबी तपासल्या जात आहेत.

शिक्षकांचा पगार आता शालार्थ आयडीच्या पोर्टलवर स्वतंत्र टॅब तयार करुन त्यातूनच केली जात आहे. त्यामुळे माहितीत तफावत असल्यास त्या शाळेचे वेतन बिल ऑनलाईन स्वीकारलेच जात नाहीत. दरम्यान, फेब्रुवारीत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनातून आयकर कपात झाला असून मार्चचा पगार अजूनही झाला नसल्याने शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता जिल्ह्यातील या २१३ माध्यमिक शाळा व अंशत: अनुदानित ४० तुकड्यांवरील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार कधीपर्यंत होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचा पसारा

  • माध्यमिक शाळा : ६५३ पैकी ५६० शाळांचे वेतन होईल

  • अनुदानित ज्युनिअर कॉलेज : १३८ पैकी १०८ कॉलेजची बिले पाठविली

  • महापालिकेच्या माध्यमिक शाळा : सहापैकी सहा शाळांचे वेतन होईल

  • अनुदानित डीएड : सहापैकी सहा कॉलेजचे वेतन होईल

  • अंशत: अनुदानित ज्युनिअर कॉलेज : १९४ पैकी १३० कॉलेजची बिले पाठविली

  • सैनिकी शाळा : एक, या शाळेचेही वेतन बिल पाठविले

  • अंशत: अनुदानित माध्यमिक शाळा : ११८ पैकी ८० शाळांची वेतन बिले पाठविली

  • अंशत: अनुदानित तुकड्या : १३० पैकी ९० तुकड्यांवरील कर्मचाऱ्यांची बिले पाठविली

वेतनासंदर्भातील अडचणी काही दिवसात सुटतील

प्रत्येक शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चार महत्त्वाची कागदपत्रे ‘शालार्थ २.०’वर अपलोड करण्याचे आदेश होते. मात्र, काही शाळांनी कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत, त्यांना लेखी पत्रे देखील काढली आहेत. त्यामुळे काही शाळांच्या वेतनबिलांचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाले असून वेतनबिलासंदर्भातील अडचणीही काही दिवसांत सुटतील.

- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Medical College: दोन तासांचे काम; महिन्याचा दाम, पुण्यातील अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांचा अनोखा फंडा

RTO Employee Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचे अस्त्र; 'या' तारखेपासून राज्यव्यापी बेमुदत संपाचा निर्णय, कारण काय?

Mumbai Crime: कांदिवली मेट्रो स्थानकात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, लिफ्टमध्ये धक्कादायक प्रकार, एकटीला गाठून केलं विचित्र कृत्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Chandrapur: काँग्रेसची उमेदवारी अग्रवालांच्या गळ्यात?; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज संस्था मतदार संघ

SCROLL FOR NEXT