univercity exam 2026

 

sakal 

महाराष्ट्र बातम्या

शिक्षकांना घ्यावे लागणार ज्यादा तास! 'नवोदय अन्‌ शिष्यवृत्ती'पूर्वी होणार ६ सराव परीक्षा; यंदा झेडपी शाळांमधील ५० विद्यार्थी ‘नवोदय’च्या गुणवत्ता यादीत

‘नवोदय’च्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी सोलापूर जिल्ह्यातील ८० जागांसाठी पाच हजारांहून अधिक विद्यार्थी बसले होते. नुकताच परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील तब्बल ५० विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : ‘नवोदय’च्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी सोलापूर जिल्ह्यातील ८० जागांसाठी पाच हजारांहून अधिक विद्यार्थी बसले होते. नुकताच परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील तब्बल ५० विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. पोखरापूर (ता. मोहोळ) येथील नवोदय विद्यालयात त्यांना सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळणार आहे.

जिल्ह्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७५ शाळा आहेत. त्या शाळांमधील इयत्ता पाचवीतील दोन हजार विद्यार्थी ‘नवोदय’च्या परीक्षेला बसले होते. त्यासाठी संबंधित शाळांमधील शिक्षकांनी त्यांचे जादा तास घेतले होते. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या गावात खासगी कोचिंग क्लास लावले होते. त्यातून ‘नवोदय’च्या परीक्षेत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची टक्केवारी यंदा वाढली आहे.

दुसरीकडे इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत देखील जिल्हा परिषदेचे विद्यार्थी चमकतील, असा विश्वास शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २०२६-२७ या वर्षात त्या वर्गातील सर्वच विद्यार्थी बसतील, असे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. त्यांचे परीक्षा शुल्क जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून भरले जाणार आहे.

आता विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षांवर भर

‘नवोदय’च्या प्रवेशपूर्व परीक्षेत सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ५० विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. पोखरापूर येथील केंद्रीय विद्यालयात इयत्ता सहावीसाठी ८० जागा आहेत, त्यात जिल्हा परिषदेचे सर्वाधिक विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले आहेत.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

शिक्षकांना घ्यावे लागणार जादा तास

आता यापुढे इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांचीच शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुमारे ३० हजार विद्यार्थी बसतात. ‘नवोदय’च्या परीक्षेसाठी देखील पाच हजारांवर विद्यार्थी असतात. या पार्श्वभूमीवर दोन्ही परीक्षा होण्यापूर्वी जिल्हा परिषदेतर्फे तीन-तीन सराव परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी शिक्षकांना जादा तास घ्यावे लागणार आहेत. जादा तास घेणे बंधनकारक नाही, पण विद्यार्थ्यांसाठी ते अतिरिक्त तास घेतील, असा विश्वास शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara IT Park : कोल्हापूर-साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, म्हसवड MIDC साठीही तब्बल 500 कोटी; मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

Satara District bank Election : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचा सावध पवित्रा

Uday Samant : यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र अनुवाद समिती स्थापन करणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

वरिष्ठ IAS अधिकारी बेपत्ता, मोबाईही बंद; शेवटचं लोकेशन बंगळुरु विमानतळावर

Nagpur News : नऊ दिवसांपासून नवजात बालिकेच्या शोधात फिरत होती महिला; मुलगी मेल्याने होती अस्वस्थ, रिक्षामधून उडी मारण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT