crime news 
महाराष्ट्र बातम्या

Palghar : आई करत होती कोणाशी तरी चॅटिंग; संतप्त लेकाने केला कुऱ्हाडीने हल्ला अन्...

सकाळ डिजिटल टीम

पालघर - पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे 17 वर्षीय मुलाने आईचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीची आई तिच्या मोबाईलवरून कोणाशी तरी चॅटिंग करत होती. त्याचवेळी मुलाने आईला मॅसेज पाठवताना पाहिले. त्याचा राग अनावर झाल्याने त्याने रविवारी रात्री उशिरा आईवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली.

ही घटना वसई शहरातील पारोळे भागातील आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शेजाऱ्यांनी सांगितल्यानुसार, माय-लेकात अनेकदा भांडण व्हायचे पण नंतर सगळं नॉर्मल व्हायचं. हा मुलगा असे करू शकेल असे कोणालाच वाटले नव्हते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा घरात आई आणि मुलाशिवाय दुसरे कोणी नव्हते. मुलाला आईच्या चारित्र्यावर संशय होता. यावरून त्याचे आईसोबत अनेकदा भांडण होत असे.

मांडवी पोलिचस ठाण्याचे निरीक्षक अशोक कांबळे यांनी सांगितले की, मुलाला त्याच्या ३५ वर्षीय आईच्या चारित्र्यावर संशय होता. यावरून त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. रविवारी रात्री मुलगा जेवण करत असताना त्याची आई तिच्या मोबाईलवर कोणाला तरी मेसेज करत असल्याचे त्याने पाहिले. यामुळे तो संतापला.

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, मुलाने कुऱ्हाडी काढली आणि कथितपणे आईवर हल्ला केला. त्याने आईवर अनेक वेळा अमानुष हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेला उपचारासाठी भिवंडी येथील इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT