FIR Filed Against Tejashwi Yadav in Gadchiroli: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल गडचिरोली येथे राजद नेते तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गडचिरोलीचे भाजप आमदार मिलिंद रामजी नरोटे यांच्या तक्रारीवरून राजद नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेजस्वी यादव यांनी सोशल मीडिया साइट X वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह आणि अपमानजनक पोस्ट शेअर केल्याचा आरोप आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम १९६ (१) (अ) (ब), ३५६ (२) (३), ३५२, ३५३ (२) अशा विविध कलमांखाली गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी राष्ट्रीय जनता दलमधून काढून टाकण्यात आलेले लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेजप्रताप यादव यांनी एक धक्कादायक आरोप केला होता. त्यांनी दावा केला आहे की पाच कुटुंबांनी मिळून त्यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
तेजप्रताप यांना लालू प्रसाद यादव यांनी केवळ पक्षातूनच नव्हे, तर कुटुंबातूनही काढून टाकले आहे. तेव्हापासून तेजप्रताप यांनी बंडखोरीची भूमिका घेतली आहे. त्यांनी महुआ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे आणि पाच पक्षांसोबत युतीही केली आहे. तेजप्रताप यांनी 'जनशक्ती जनता दल' हा स्वतःचा पक्षही स्थापन केला आहे आणि त्याच्या नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.