Maharashtra Temperature Sakal
महाराष्ट्र बातम्या

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तापणार

राज्यातील उन्हाचा चटका वाढला असून कमाल तापमान चाळिशीपार पोहोचले आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

राज्यातील उन्हाचा चटका वाढला असून कमाल तापमान चाळिशीपार पोहोचले आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली आहे.

पुणे - राज्यातील उन्हाचा (Summer) चटका वाढला असून कमाल तापमान (Temperature) चाळिशीपार पोहोचले आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट (Heat Wave) अधिक तीव्र झाली आहे. विदर्भातील अकोला येथे आज उच्चांकी ४२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आजपासून (ता. ३०) उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्याच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान सातत्याने ४१ अंशांच्या पुढे आहे. राज्याच्या तापमानात आजपासून (ता. ३०) २ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. नगर येथे ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांची वाढ झाल्याने तेथे उष्णतेची लाट आली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात २ एप्रिलपर्यंत उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. आहे. अकोल्यातील तापमान २३ मार्च ते २८ मार्चपर्यंत सर्वाधिक असल्याची नोंद भारतीय हवामान खात्याने केली आहे. वायव्येकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पश्चिम विदर्भात मागील काही दिवसात सर्वाधिक तापमान आहे. तर राजस्थानमधून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे विदर्भातील तापमानात मोठे बदल होणार असून अनेक जिल्ह्यांत उष्णतेची लाट आणखी तीव्र होईल.

येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा

३० मार्च - जळगाव, औरंगाबाद, नगर, जालना, परभणी, अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर

३१ मार्च - औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर

१ एप्रिल - जळगाव, औरंगाबाद, नगर, जालना, परभणी, बुलडाणा, हिंगोली, अकोला

२ एप्रिल - जळगाव, औरंगाबाद, नगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला

येलो अलर्ट

मध्य महाराष्ट्र - जळगाव, नगर. मराठवाडा : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली. विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT