महाराष्ट्र

विदर्भात उष्णतेची लाट कायम

सकाळवृत्तसेवा

राज्यात 19 जिल्ह्यांत पारा चाळिशीच्या वर
पुणे - विदर्भाच्या काही भागातील उष्णतेची लाट कायम असून, मध्य महाराष्ट्राच्या काही ठिकाणी दुपारच्या उन्हाच्या चटक्‍यानंतर रात्रही उष्ण झाली आहे. पुढील दोन दिवसांनंतर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. पुण्यात येत्या गुरुवारी (ता. 30) दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. शहरात चाळिशीपर्यंत वाढलेला कमाल तापमानाचा पारा येत्या रविवारपर्यंत (ता. 2) 36 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.

राज्यात अकोला येथे सर्वाधिक म्हणजे 44.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यात चाळिशी ओलांडलेला कमाल तापमानाचा पारा सलग दुसऱ्या दिवशी कायम होता. संध्याकाळी साडेपाचपर्यंत शिवाजीनगर येथे 40.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंदविण्यात आले असून, लोहगाव येथे कमाल तापमानाच्या पाऱ्याने 41 अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

राज्यात 19 जिल्ह्यांमध्ये पारा चाळिशीच्या वर गेला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी पारा चाळिशीच्या वर गेला गेला आहे. तेथे कमाल तापमानाच्या सरासरीपेक्षा पाच अंश सेल्सिअसने तापमान वाढले आहे. मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह नगर, जळगाव, मालेगाव, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये उन्हाचा चटका वाढला आहे.

पुण्यात दिवसाप्रमाणेच रात्रही उष्ण झाल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले. आतापर्यंत पुण्यात राज्यातील सर्वांत कमी तापमान नोंदले जात होते. गेल्या चोविस तासांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा पाच अंश सेल्सिअसने वाढून 22.8 अंश सेल्सिअस नोंदण्यात आल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

का वाढलयं तापमान?
राजस्थानच्या वाळवंटावरून उष्ण आणि कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत उष्णतेची लाट निर्माण झाली आहे; तसेच स्थानिक वातावरणाचा परिणाम होऊनही कमाल तापमानाचा पारा वाढला आहे.

हवामान अंदाज
30 व 31 मार्च - संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता
1 एप्रिल - मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता.
2 एप्रिल - मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

दृष्टिक्षेपात राज्याचे तापमान (सर्व आकडे अंश सेल्सिअसमध्ये, कंसात सरासरीपेक्षा वाढलेले तापमान)
पुणे 40.1 (3.4), नगर 42.6 (4.8), जळगाव 42.8 (3.2), कोल्हापूर 37.2 (0.6), महाबळेश्वर 33.4 (1.9), मालेगाव 43.2 (5.1), नाशिक 40.3 (3.7), सांगली 39.3 (1.7), सातारा 39.6 (3.8), सोलापूर 40.9 (2.1), सांताक्रूझ 32.8 (-0.5), अलिबाग 33.1 (1.8), रत्नागिरी 32.8 (1), डहाणू 35 (3), औरंगाबाद 41.4 (4.3), परभणी 41.8 (3.1), अकोला 44.1 (5.4), अमरावती 42.2 (3.6), बुलडाणा 41 (5.5), चंद्रपूर 42.8 (3.4), नागपूर 43 (4.9), वाशीम 39.2, वर्धा 43.0 (5), यवतमाळ 42 (4.1)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळेंकडून दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

SCROLL FOR NEXT