Temperature Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात तापमान पुन्हा वाढणार; विदर्भात पारा ४० अंशांवर स्थिर

राज्यातील काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे बहुतांश भागात कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

राज्यातील काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे बहुतांश भागात कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे.

पुणे - राज्यातील काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे बहुतांश भागात कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यात पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहणार असून, तापमानात पुन्हा काहीशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मराठवाड्यात शनिवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. मात्र, विदर्भात अद्याप तापमानाचा पारा ४० अंशांवर स्थिर आहे. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान गोंदिया येथे ४४.५ अंश सेल्सिअस, तर नीचांकी तापमान महाबळेश्‍वर येथे १६.८ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.

पश्‍चिम महाराष्ट्रातील महाबळेश्‍वर, सांगली, कोल्हापूर येते पारा ३० अंशांच्या खाली गेला आहे. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ३ ते ७ अंशांनी घट झाली आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी पारा ४३ अंशांच्या पुढे आहे. मात्र, आता पाऊस कमी होण्याची चिन्हे असून तापमान पुन्हा हळू-हळू वाढण्याची शक्यता आहे. सध्या दक्षिण कर्नाटक आणि परिसरावर सक्रिय असलेल्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती आंध्र प्रदेशातील रायलसीमाकडे सरकली आहे. त्यामुळे राज्यात हवामान कोरडे होत असून कोकणात मात्र तुरळक भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पुण्यात निरभ्र आकाशाची शक्यता

पुणे - शहर परिसरात ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात चांगलीच घट पाहायला मिळाली. त्यामुळे पुणेकरांचीदेखील उन्हाच्या चटक्यापासून सुटका झाली होती. मात्र, आता परिसरात आकाश निरभ्र राहणार असून कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता शनिवारी हवामान विभागाने वर्तविली आहे. शहरात शनिवारी ३४.६ अंश सेल्सिअस, तर लोहगाव येते ३५.४ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांत शहरात ढगाळ वातावरण कायम आहे. शनिवारी, मात्र पुन्हा आकाश निरभ्र झाले होते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या शुक्रवारपर्यंत (ता. २७) परिसरात आकाश निरभ्र राहणार असून अधून-मधून अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे कमाल तापमान पुन्हा ३९ अंशांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT