Pandharpur
Pandharpur 
महाराष्ट्र

मंदिर समितीचे सदस्य अधटराव निलंबित

सकाळवृत्तसेवा

पंढरपूर - श्री विठ्ठल- रुक्‍मिणीच्या झटपट दर्शनाचा काळाबाजार केल्याच्या प्रकरणातील आरोपी सचिन अधटरावला निलंबित करण्याचा ठराव श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीच्या बैठकीत शुक्रवारी बहुमताने करण्यात आला. मंदिर समितीचे सदस्य आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचे कोणीही समर्थन करू शकत नाही. पक्षपातळीवर त्यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात झटपट दर्शन मिळवून देण्याचे आमिष दाखवून भाविकांकडून पैसे घेतले जात होते. याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांसह मंदिर समिती सदस्य सचिन अधटराव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. बैठकीत सदस्य अधटराव याने त्याची बाजू मांडली. त्यानंतर अधटरावचे निलंबन करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. आमदार राम कदम यांनी केलेल्या बेताल वक्तव्यासंदर्भातही चर्चा झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी डॉ. भोसले यांची गाडी अडवून आमदार कदम यांचे निलंबन करण्याची मागणी केली.

प्राथमिक सुविधांनंतरच टोकन पद्धत
श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी तिरुपतीच्या धर्तीवर टोकन दर्शन व्यवस्था करण्यासाठी पत्राशेडच्या ठिकाणी हे हॉल बांधण्यात येणार आहेत. त्यानंतरच टोकन पद्धत सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. बडवे- उत्पात सेवाधाऱ्यांच्या निवेदनाविषयी डॉ. भोसले म्हणाले, ""या मंडळींनी मंदिराची सेवा केली, त्यामुळे त्यांच्या मागण्यांचा विचार कायद्याला अधीन राहून सहानुभूतीने केला जाईल.
पृथ्वीराज बाबांनी काय दिवे लावले ते सांगावे.''

"चव्हाण यांनी पंढरपूरसाठी काय केले?'
दर्शनपास विक्रीमागे सोनेरी टोळी आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंढरपुरात दोन दिवसांपूर्वी केला होता, त्या संदर्भात डॉ. भोसले म्हणाले, 'चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी पंढरपूरसाठी काय केले ते आधी सांगावे आणि मग त्यांनी आमच्या कामाविषयी बोलावे. त्यांच्या मूळ कुंभारगावात त्यांचा सरपंच नाही. ज्या कऱ्हाडने त्यांना मागील निवडणुकीत आघाडी दिली, तिथे त्यांचा नगराध्यक्ष नाही. त्यामुळे आधी त्यांनी गावाकडे लक्ष द्यावे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! अमेरिकेतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

SCROLL FOR NEXT