tempo fire.jpg 
महाराष्ट्र बातम्या

आणि हा हा म्हणता टेम्पोने घेतला पेट.....

ज्ञानेश्वर गुळवे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावर इगतपुरी येथील हॉटेल ग्रीन लॅन्ड समोर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या भरधाव वेगात असलेल्या  टेम्पो ट्रॅव्हल क्रं (MH04 GP3132) मधून धूर निघत असल्याचे निदर्शनास आल्याने महामार्ग पोलीसांनी या गाडीस थांबविले. यावेळी गाडीतुन मशीन शॉर्ट सर्किट झाल्यामुळे धूर निघत असल्याचे निदर्शनात आले. वाहतूक पोलीसांनी तात्काळ टेम्पो ट्रॅव्हल मधील ६ पुरुष,५ महिला व ३ लहान मुले अशा प्रवाशांना टेम्पो ट्रॅव्हल मधून खाली उतरून घेतले. यानंतर पोलीसांनी तात्काळ घोटी टोल नाका फायर बिग्रेड, महिंद्रा कंपनी, फायर बिग्रेड यांना बोलावून गाडीची विझविण्यात आली आहेत.

वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांची जीवित हानी टळली.
या घटनेमध्ये गाडी पूर्ण पेटल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. वेळीच महामार्ग पोलीस यांच्या तत्काळ मदतीने मोठी जीवित हानी टळली. तसेच घटनेमध्ये जीवितहानी अथवा कोणास काही दुखापत झालेली नाही. घोटी वाहतूक पोलीस ए.हिरे,हवालदार बंडे, शिरसागर, दिंदे पोलिस नाईक, राम वारुंगसे, पाटोळे,पाटील, शिपाई नंदन,सहाने,कापसे आदींनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

Sugar Export Ban: निर्यात बंदीमुळे देशातील साखर उद्योगासमोर संकट: हर्षवर्धन पाटील यांची माहिती; आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम होणार!

SCROLL FOR NEXT