JN.1 Covid esakal
महाराष्ट्र बातम्या

Corona JN.1 Virus: राज्यात ‘जेएन.१’चे दहा रुग्ण; कोणीही अत्यवस्थ नाही; घाबरून न जाण्याचे आवाहन

Corona JN.1 Virus: राज्यात कोरोनाच्या नव्या ‘जेएन.१’ व्हेरियंटचे दहा रुग्ण आढळले. त्यापैकी पुण्यात दोन, तर सर्वाधिक पाच रुग्ण ठाणे महापालिकेत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

देशात आता ‘जेएन.१’चे रुग्ण आढळत असून, सर्व पूर्णपणे बरे होत आहेत. कोणताही रुग्ण अत्यवस्थ नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने बुधवारी केले. राज्यात आढळलेल्या १० रुग्णांपैकी आठ पुरुष व दोन महिला आहेत. यापैकी आठ रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. पुण्यातील एक रुग्ण अमेरिकेतून आला असून, त्याच्यासह सर्व रुग्ण घरातच विलगीकरण करून उपचार घेत आहेत. या सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत, असेही आरोग्य विभागाने सांगितले.

वर्षभरात १३६ मृत्यू

राज्यात एक जानेवारी २०२३ पासून आतापर्यंत कोरोनाच्या १३६ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी ७१.३२ टक्के रुग्ण ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.

जिल्ह्यांना दक्षतेचा आदेश

‘जेएन.१’ हा ओमिक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ओमिक्रॉन व्हेरियंट होता. त्यानंतर आता त्याचा हा नवीन उपप्रकार देशातील रुग्णांना होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यामुळे रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत. या सर्वेक्षणांमध्ये आढळून आलेल्या संशयित रुग्णांच्या कोरोनाची चाचणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यांना कोरोना चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.

हे करा

मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंड विकार अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा

गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरा

वारंवार स्वच्छ पाण्याने हात धुवा

रुग्ण दृष्टिक्षेपात

सक्रिय रुग्ण संख्या १९४

गृह विलगीकरणातील रुग्ण १६२

दाखल रुग्ण ३२

असे वाढले रुग्ण

३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर १४

७ ते १३ डिसेंबर २१

१४ ते २० डिसेंबर ४६

२१ ते २७ डिसेंबर २६७

‘जेएन.१’चे रुग्ण

ठाणे महापालिका ५

पुणे महापालिका २

पुणे ग्रामीण १

अकोला महापालिका १

सिंधुदुर्ग १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! केवायसीनंतर अनेक ‘लाडक्या बहिणी’ अपात्र; गोरगरीब महिलांना लाभापासून वंचित राहण्याची वेळ, शासन करतय काय?

अग्रलेख - विवेकी स्वर लोपला

आजचे राशिभविष्य - 09 जानेवारी 2026

Egg Paratha Recipe: ब्रेकफास्टसाठी हेल्दी काहीतरी खास हवंय? 15 मिनिटांत तयार होणारा ‘अंडा पराठा’ ट्राय करा

३० लाख लाडक्या बहिणी चिंतेत! ‘ई-केवायसी’ची मुदत संपली, आता लाभ बंद होणार; १ एप्रिलपासून ‘या’ लाडक्या बहिणींनाच दरमहा मिळणार लाभ

SCROLL FOR NEXT