Sangali Flood 
महाराष्ट्र बातम्या

पूरबाधितांना तात्काळ १० हजारांची मदत; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

पंचनाम्यातून सगळे आकडे आल्यानंतर अधिकची मदत दिली जाईल

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळं फटका बसलेल्या पूरबाधितांना तात्काळ १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज (बुधवार) मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. दरम्यान, पूरग्रस्त भागातील बहुतांश ठिकाणी अद्याप पाणी ओसरले नसल्याने व बाधितांचे पंचनामे सुरु असल्याने पुढील पंधरा दिवसांत वाढीव मदत देण्याचाही निर्णय झाला आहे. नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी कराड येथे दिली. (ten thousand will be given to flood victims immediately Cabinet Decision aau85)

महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती 'क' आणि 'ड' वर्गांत ज्यांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे त्यांना ५० लाखांची मदत केली जाणार असल्याचंही नगरविकास खात्यानं सांगितलं आहे. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, "पूरबाधितांच्या मदतीवरुन कोणीही राजकारण करू नये, मदतीसाठी आम्ही सगळे तत्पर आहोत. मदत करण्यासाठी पाणी ओसरणं गरजेचं होतं."

धोकादायक भागातील लोकांच्या पुनर्वसनासाठी उपसमिती स्थापणार

दरम्यान, धोकादायक भागातील गावांचं पुनर्वसनाच्या आराखड्यासाठी उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच जोपर्यंत पूरबाधितांचं पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत त्यांना सुरक्षितस्थळी हलवलं जाईल. धोकादायक दरडी खाली आणि पूर रेषेत राहणार्‍या लोकांचे पुनर्वसन केलं जाणार आहे, असंही यावेळी शिंदे यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: महाराष्ट्रात धोक्याची घंटा! पुढील २४ तासांत ३१ जिल्ह्यांना वादळ-पावसाचा तडाखा, IMD चा मोठा इशारा

Latest Marathi News Live Update : पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

Amit Thackeray: मनसेचे अमित ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, मोहोळ तालुक्यातील गारपीटग्रस्त पिकांची पाहणी, मुख्यमंत्र्यांकडे करणार नुकसानभरपाईची मागणी!

आमदार यड्रावकरांचे ३१ लाखांचे बील थकीत तरी महावितरणचा कानाडोळा, ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन तोडलं; 'स्वाभिमानी'चा गंभीर आरोप

Gachiroli News: गडचिरोलीत वैशाखापूर्वीच वाढला उन्हाचा पारा; भर दुपारी रस्ते सुनसान; उन्हाच्या तिव्रतेमुळे आत्तापासूनच अनेकजण हैराण

SCROLL FOR NEXT