दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांची धांदल  sakal
महाराष्ट्र बातम्या

दहावी-बारावीचा निकाल 10 जूनपूर्वी: एका शिक्षकाकडे 250 पेपर तपासणीची जबाबदारी

दहावी-बारावीची परीक्षा अंतिम टप्प्यावर असून दहावीचा सोमवारी तर बारावीच्या विद्यार्थ्यांचा 7 एप्रिलला शेवटचा पेपर आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेत दोन्ही परीक्षांचे निकाल 10 जूनपूर्वी जाहीर होईल, असे नियोजन बोर्डाकडून करण्यात आले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : दहावी-बारावीची परीक्षा अंतिम टप्प्यावर असून दहावीचा सोमवारी तर बारावीच्या विद्यार्थ्यांचा 7 एप्रिलला शेवटचा पेपर आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेत दोन्ही परीक्षांचे निकाल 10 जूनपूर्वी जाहीर होईल, असे नियोजन बोर्डाकडून करण्यात आले आहे. विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. पण, बोर्डाकडून आता राखीव 12 हजार शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे.

कोरोनाचे संकट डोक्‍यावर असतानाही आणि बहुतेक दिवस शाळा, महाविद्यालये बंद असतानाही दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा यशस्वीपणे पार पडत आहे. तब्बल 31 लाख 27 हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कॉपी करून पेपर लिहिण्याचे प्रमाण 60 टक्‍क्‍यांनी कमी आढळले. विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्याच शाळेत झाल्याने हा बदल पाहायला मिळाला. कोरोनामुळे परीक्षेत विद्यार्थ्यांची अनुपस्थिती वाढू नये म्हणून बोर्डाने शाळा तेथे केंद्र उपलब्ध करून दिले. त्यामुळे परीक्षेतील गैरहजेरी खूप कमी राहिली. दुसरीकडे 75 टक्के अभ्यासक्रमांवर आधारित पेपर सोडविण्यासाठी अर्धा तास वाढवून देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांवर कोणताही तणाव राहिला नाही. कोरोनाचे संकट दूर झाले असून आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर निकाल वेळेत जाहीर करण्याची तयारी बोर्डाने सुरू केली आहे. दहावीच्या 16 लाख 40 लाख तर बारावीच्या 14 लाख 87 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यांचे पेपर तपासणीसाठी जवळपास 40 हजार शिक्षकांची मदत घेतली जात आहे. यंदा दहावी व बारावीचा निकाल 100 टक्के लागेल, असा विश्वास शाळा, महाविद्यालयांनी व्यक्त केला आहे.

एका शिक्षकाकडे 250 पेपरची जबाबदारी
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासणीसाठी विनाअनुदानित शिक्षकांनी नकार दिला आहे. शाळेला अनुदान देण्याची त्यांची मागणी आहे. त्यांची मागणी बोर्डाने शालेय शिक्षण विभागाला कळवली, पण त्यावर अजून तोडगा निघालेला नाही. त्यांनी पेपर तपासणीसाठी नकार दिल्याने अनुदानित शाळांमधील राखीव शिक्षकांची मदत घेतली जात असून त्या शिक्षकांना तशा दिल्या आहेत. एका शिक्षकास 200 ते 250 पेपर तपासणीसाठी दिले आहेत.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावी- बारावीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्यांची संख्या कमी झाले आहे. पेपर संपल्यानंतर 60 दिवसांत म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर होतील. विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयांमधील शिक्षकांची त्यांच्या प्रलंबित मागण्यांमुळे पेपर न तपासण्याची भूमिका घेतली आहे. तरीही, निकाल वेळेतच जाहीर होईल.
- शरद गोसावी, अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NANA PATEKAR PASSES AWAY: ‘नाना पाटेकर’ नाही, तर हे आहे अभिनेत्याचं खरं नाव; ‘नाना’ नावामागची गोष्ट भन्नाट

Fake Currency Notes : बापरे... बँकेतच १७ कोटींच्या बनावट नोटा, आता १.४३ कोटींच्या जुन्या नोटा; नेमकं कोणतं मोठं रॅकेट?

Latest Marathi News Live Update : अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन, शरद पवार काय म्हणाले, दुष्काळावर काम करणारा माणूस गेला...

मैत्री असावी तर अशी! नाना पाटेकरांच्या कठीण काळात अशोक सराफ ठरले आधार; ‘त्या’ एका कोऱ्या चेकची गोष्ट आजही कायम आहे!

Police Officer Death: पुण्यात PSIने पिस्तुलातून गोळी झाडून घेत संपवलं आयुष्य, का उचललं टोकाचं पाऊल?

SCROLL FOR NEXT