महाराष्ट्र बातम्या

जान मोहम्मदबाबत धक्कादायक माहिती आली समोर, बहरीनला करणार होता एकाची हत्या?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दिल्ली पोलिसांनी घातपाताचा कट उधळून लावत सहा जणांना अटक केली होती. त्यामध्ये मुंबईतील आरोपी जान मोहम्मद (Jan mohmmad) याचाही समावेश आहे. त्याला राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आली. मात्र, आता जान मोहम्मदबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तो बहरीन (bahrain) देशात एका व्यक्तीचा हत्या करण्यासाठी गेला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दिल्ली पोलिसांनी १४ सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास दहशतवादी माड्युल उधळून लावले. यावेळी राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतून सहा जणांना अटक केली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील आरोपी जान मोहम्मद उर्फ समीर कालिया हा एक होता. त्याने मुंबई लोकलची रेकी केल्याची माहिती देखील समोर आली होती. एटीएसने धारावीतील त्याच्या पत्नीची कसून चौकशी देखील केली. त्याचे 20 वर्षांपासून दाऊदशी जुने संबंध होते. सध्या त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. तो धारावीच्या झोपडपट्टीत रहायचा. 13 तारखेला तो दिल्लीला जाणार होता. तिकीट उपलब्ध नसल्यामुळे रेल्वेमधून तात्काळने जाण्याचं नियोजन केलं. आरोपी गोल्डन टेम्पल ट्रेनने दिल्लीला रवाना झाला होता. जान मोहम्मद अली महम्मद शेखला रेल्वे राजस्थानमधील कोट्यामध्ये अटक करण्यात आली, अशी माहिती एटीएस प्रमुखांनी दिली होती.

आता याच जान मोहम्मदबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तो २०१९ मध्ये बहरीनला एका व्यक्तीची हत्या करण्यासाठी गेला होता. पण, काही कारणास्तव त्याला हत्या न करताच त्याला परतावे लागले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, याच आरोपीबाबत अधिक माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक(एटीएस) व गुन्हे शाखेचे एक पथक दिल्लीला रवाना झाले आहे.

जान मोहम्मद शेख कोण आहे?

महाराष्ट्र एटीएसतर्फे देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे जान मोहम्मद शेख एटीएसच्या रडारवर होता. त्याला मुंबईत अनेक वर्ष टॅक्सी चालवण्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्याला मुंबईच्या रस्त्यांची खडा न् खडा माहिती आहे. त्याच्यावर मुंबईत घातपात घडवून आणण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार होती, अशी माहिती मिळत आहे. जान मोहम्मद हा 13 सप्टेंबर रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरुन दिल्लीला रवाना झाला होता. जान मोहम्मदचा अनेक वर्षांपूर्वीपासूनच दाऊद गँगसोबत संबंध होता. जवळपास 20 वर्षांपूर्वी जान मोहम्मदवर मुंबईच्या पायधुनी पोलीस ठाण्यात गोळीबार, तोडफोड, चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

SCROLL FOR NEXT