Police Recruitment sakal
महाराष्ट्र बातम्या

Police Recruitment : पाऊस असलेल्या ठिकाणी चाचण्या पुढे ढकलणार; पोलिस भरतीप्रकरणी फडणवीसांची घोषणा

सध्या सुरू असलेल्या पोलिस भरतीसाठी जेथे पाऊस आला असेल तेथील मैदानावरच्या शारीरिक चाचणी परीक्षा पुढे ढकलण्यात येतील, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - सध्या सुरू असलेल्या पोलिस भरतीसाठी जेथे पाऊस आला असेल तेथील मैदानावरच्या शारीरिक चाचणी परीक्षा पुढे ढकलण्यात येतील, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले.

ते म्हणाले, ‘आचारसंहिता काळात तसेच पुढे येणारा पाऊस लक्षात घेता युवकांचे वय पुढे जाऊ नये यासाठी तातडीने पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढे भरती होऊ शकली नाही तर मुलांचे वय वाढते आणि त्यांना मिळणाऱ्या संधी वय वाढल्यामुळे संपतात. ही गोष्ट टाळण्यासाठी पाऊस पडायच्या आत चाचण्या सुरू करा आणि भरती करा, असे आदेश देण्यात आले आहेत.

‘जेथे पाऊस असेल तेथे चाचणी पुढे ढकलली जाईल. याबरोबरच बऱ्याच ठिकाणी मुले बाहेरून आलेली आहेत. कोणतीही सोय नसल्यामुळे मुले बसस्थानक व इतर ठिकाणी राहतात. अशा ठिकाणी तेथील पोलिस स्थानकांनी त्यांच्या अधिकारात मंगल कार्यालय घेऊन या मुलांच्या निवासाची व्यवस्था करावी, असेही आदेश देण्यात आले आहेत,’ असे फडणवीस यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता CJP ची नवी लढाई; अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा, नेमका काय प्लॅन? सरकारचं टेन्शन वाढणार?

भारतीय संघाच्या फिटनेसवर BCCI चा 'सर्जिकल स्ट्राईक'! सीनियर-ज्युनियर पाहू नका, सर्वांना एकच नियम... वाचा BCCI Fitness Standards

Maharashtra Politics: कल्याण-डोंबिवलीतील राजकीय समीकरण पालटले! शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश, एकनाथ शिंदेंना धक्का

Drug Disposal Pune : ड्रग माफियांना मोठा झटका ! पुणे अन् धुळ्यात मोठी कारवाई; ९,५३६ किलो अमली पदार्थांचा साठा नष्ट, मोठे रॅकेट उघड

राजपाल यादवने बँकेकडून सुद्धा घेतलेलं १६ कोटींचं कर्ज, ते पण फेडलं नाही? आता घराचा होणार लिलाव

SCROLL FOR NEXT