tet exam sakal
महाराष्ट्र बातम्या

‘टीईटी’ परीक्षा! प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानावर असणार आता ‘क्यूआर कोड’; सोडविलेल्या प्रश्नांची संख्याही नोंदवावी लागणार; ‘नीट’च्या पेपर फुटीनंतर परीक्षा परिषदेची सावधगिरी

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २८ जून रोजी होणार आहे. ‘नीट’चा पेपर फुटल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ‘टीईटी’पूर्वी प्रश्नपत्रिकेत मोठा बदल केला आहे. प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानावर ‘चिन्हांकित क्यूआर कोड’ असणार आहे. परीक्षेवेळी कोणाची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर बाहेर गेल्यास, ती नेमकी कोणाची, हे ‘क्यूआर कोड’द्वारे समजणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २८ जून रोजी होणार आहे. ‘नीट’चा पेपर फुटल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ‘टीईटी’पूर्वी प्रश्नपत्रिकेत मोठा बदल केला आहे. प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानावर ‘चिन्हांकित क्यूआर कोड’ असणार आहे. परीक्षेवेळी कोणाची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर बाहेर गेल्यास, ती नेमकी कोणाची, हे ‘क्यूआर कोड’द्वारे समजणार आहे.

राज्यात ‘टीईटी’साठी एकूण चार लाख २८ हजार १२२ परीक्षार्थींनी नोंदणी केली आहे. पेपर- १ आणि पेपर- २ साठी एकूण सहा लाख १२५ अर्ज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला प्राप्त झाले आहेत. यात सेवेतील दोन लाख २६ हजार २६३ शिक्षक आहेत. ‘टीईटी’त प्रत्येकी १५० गुणांचे दोन पेपर असतात. पेपर- १ हा इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांवरील शिक्षकांसाठी आणि पेपर- २ हा इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांसाठी असतो. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना किमान ६० टक्के (किमान ९० गुण) मिळवणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान ५५ टक्क्यांची (८२ ते ८३ गुण) अट आहे.

प्रश्नांची संख्या नोंदविण्याचे बंधन

‘टीईटी’चा पेपर दिल्यानंतर उत्तरपत्रिका जमा करण्यापूर्वी प्रत्येक परीक्षार्थीस त्याने सोडविलेल्या प्रश्नांची संख्या शेवटी नोंदवावी लागणार आहे. प्रश्नपत्रिकेतील किती प्रश्न उमेदवाराने सोडविले आणि किती सोडविले नाहीत, याची संख्या लिहिण्यासाठी शेवटी एक बॉक्स दिला जाणार आहे; जेणेकरून कोणाला काहीही आरोप करण्यास वाव राहणार नाही.

दुपट्टा, बुरखा, टोपीसंदर्भात ८०० ई-मेल

‘टीईटी’ परीक्षार्थींना परीक्षेवेळी मानेच्या वर काहीही वस्त्र घालता येणार नाही. दुपट्टा, बुरखा, मास्क, टोपी यापैकी काहीही घालता येणार नाही, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. त्यावर ई-मेलद्वारे ८०० हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. त्या पाहून काही दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रश्नपत्रिका केंद्रापर्यंत पोचेपर्यंत व्हिडिओ चित्रीकरण

२८ जून रोजी शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. त्यासाठी सव्वाचार लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानावर क्यूआर कोड, प्रश्न सोडविले किती याची नोंद, असे बदल करण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका केंद्रावर नेईपर्यंंत व्हिडिओ चित्रीकरण तर आम्ही करतोच.

- डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyadhar Anaskar : आरबीआयच्या नव्या पतधोरणामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागण्याची शक्यता; समतोल राखण्याचे बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान

Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

Sakal Karandak Competition : पुणे विभागातून ‘लाजाळू’ अंतिम फेरीत; ‘ईमान’ला द्वितीय; ‘नातीगोती’ला तृतीय क्रमांक

Delhi Building Collapse: दिल्लीत भीषण दुर्घटना! चार मजल्यांची इमारत कोसळली, गरोदर मातेसह तिघांचा मृत्यू

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही कायम

SCROLL FOR NEXT